पुणे

सणासुदीच्या तोंडावर महागले खाद्यतेल

CD

रांजणगाव सांडस, ता. ४ ः शेंगदाणा वगळता सर्वच खाद्यतेलाच्या किंमतीत गेल्या एक महिन्याच्या तुलनेत एक लिटर मागे २५ ते ३० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. त्यात प्रामुख्याने सोयाबीन, पाम, सर्की, सूर्यफूल आदी तेलांचा समावेश आहे. मात्र, शेंगदाणा तेल त्याला अपवाद आहे. अतिवृष्टीमुळे तेलबियांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. तसेच आयात शुल्कात वाढ केल्याने तेलांच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी घटस्थापना, दसरा, दिवाळी या सणांच्या तोंडावर गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे.

अनेकांची आर्थिक ओढाताण होत असतानाच स्वयंपाक घरात रोज लागणारे खाद्यतेल दर आलेख मात्र चढताच आहे. स्वयंपाक घरात तेलाचा वापर अनिवार्य आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना त्याची मोठी झळ बसत आहे. दसरा-दिवाळीत फराळाचे पदार्थ बनवण्यासाठी गोड्या तेलाची मोठी मागणी असते. परंतु, बाजारातील वाढलेल्या किमतीमुळे गृहिणींच्या गोड्या तेलाच्या वापरावरती मोठा लगाम बसणार आहे. बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत झालेली वाढ पुढेही कायम राहण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली.

केंद्र सरकारने आयात खर्च वाढविल्याने देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सरकारने हा निर्णय देशातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतला आहे. गेल्या काही वर्षात तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी अपेक्षित भाव मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. शेतकऱ्यांच्या या नुकसानीची दखल घेऊन केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सोयाबीनसह प्रमुख तेलबिया पिकांचे भाव वाढले. ज्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. परंतु, त्या प्रमाणामध्ये भाव मिळाला नाही.

सोयाबीन व पामतेलाने मोडले कंबरडे
सर्वसामान्य नागरिकांकडून स्वयंपाकासाठी सोयाबीन व पामतेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याच सोयाबीन आणि पामतेलाने प्रति लिटर १३० रुपये गाठले आहे. सध्या बाजारात सोयाबीन तेल १२५ ते १३० रुपये तर पामतेत १२० ते १२५ रुपये मिळत आहे. हॉटेल व्यवसायाकडून पामतेलाची सर्वाधिक खरेदी केली जात असते.


किंमत का वाढते
भारतात सर्वसाधारणपणे ७० टक्के खाद्यतेल परदेशातून आयात केले जाते. तीस टक्के खाद्यतेल भारतात तयार होते. केंद्र सरकारला पाम तेलावरील आयात शुल्क घेते त्याचा परिणाम खाद्य तेलाच्या किमतीवर झाला आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे, सूर्यफूल, सरकीचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली, त्याचा परिणाम आहे. खाद्यतेलाच्या निर्मितीवर झाला आहे.

किरकोळ बाजारातील दर- (प्रति लिटर)
सोयाबीन १२५ ते १३०
सूर्यफूल १३५ ते १४५
पाम १२० ते १२५
सर्की १५० ते १६०
शेंगदाणा १६० ते १७०

घटस्थापना, दसरा, दिवाळी या सणांच्या तोंडावरती एक लिटर मागे पंचवीस ते तीस रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी आम्ही सण साजरा करावा की नाही, अशी पंचायत झाली आहे. आमच्या सारख्या सामान्य माणसासह मध्यमवर्गीय कुटुंब देखील मेटाकुटीला आली आहे. त्यामुळे सरकारने गोडेतेल रेशनवर द्यावे.
- लताताई चव्हाण, गृहिणी, उरळगाव (ता. शिरूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT