पुणे

शिनोली येथे शर्यतीत २०० बैलगाडे सहभागी

CD

शिनोली, ता. ७ : शिनोली (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत श्री. भैरवनाथांचा यात्रा महोत्सव उत्साहात झाला. यात्रा उत्सवानिमित्त भरविलेल्या बैलगाडा शर्यतीत २०० बैलगाडे सहभागी झाल्याचे भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक बोराडे यांनी सांगितले.
अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरणताई वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी यात्रा उत्सवामध्ये सहभाग घेतला. बैलगाडा यात्रेसाठी तीन दुचाकी, एक फ्रिज, एक एलसीडी, एक जूंपता गाडा, एक सायकल व सुमारे एक लाख ९१ हजार ७७७ रुपयाची रोख बक्षीसे व सतत तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या बैलगाड्यास एक लाख ११ हजार १११ रुपये इनाम ठेवण्यात आला होता.
बैलगाडा यात्रेत कै.भगवान बाबूराव गावडे (गावडेवाडी) यांनी घाटाचा राजा हा किताब पटकविला. फायनल प्रथम क्रमांक - धनेश मुरलीधर टेमकर (अवसरी), द्वितीय क्रमांक - कै.भगवान बाबूराव गावडे (गावडेवाडी), तृतीय क्रमांक - उत्तम शेठ भीमाजी गव्हाणे (लांडेवाडी), चतुर्थ क्रमांक - कै. भाग धोंडू शिंदे (वडगाव काशिंबेग), विठ्ठल जयराम आंबेडकर (कानसे), पाचवा क्रमांक - दत्तात्रेय बाळकृष्ण वावरे (गंगापूर). यात्रा कालावधीत हारतुरे, कलाप्रसाद, भजन, दंडवते, पालखी, तसेच रात्री लोक मनोरंजनाचा कार्यक्रम, दुसऱ्या दिवशी काल्याचे कीर्तन त्यानंतर महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन केले होते.
कुस्त्यांच्या आखाड्यात नामवंत मल्लांनी सहभाग घेतला होता. आखाड्यामध्ये पाचशे रुपये पासून ते पाच हजार रुपये पर्यंतच्या कुस्त्या लावण्यात आल्या. यात्रेचे नियोजन भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, गावातील व वाड्यावस्त्यांवरील तरुण मित्र मंडळ व मुंबईकर मंडळी व ग्रामस्थांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT