शिनोली, ता. ३० : ‘‘यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ आंबेगाव व टाटा मोटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व तिच्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहावे म्हणून ‘माझी पोषण परसबाग’ ही विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार घोलप यांनी दिली.
कुटुंबाच्या विविध जबाबदाऱ्या घेत पार पडताना कुठे तरी, आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. त्याचाच भाग म्हणून कुटुंबातील लहान मुले, किशोरवयीन मुली, गरोदर माता, ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, तसेच त्यांच्या आहारात विविध प्रकारचा विषमुक्त भाजीपाला आला तर, आरोग्यावर होणारा खर्च कमी करून आर्थिक बचत व्हावी. यासाठी टाटा मोटर्स सामाजिक विभाग महिलांना सर्वोतोपरी मदत करेल, असा विश्वास यावेळी टाटा मोटर्स समाजविकास विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक लितेश अत्तारदे यांनी व्यक्त केला.
यावेळी गंगूबाई बोऱ्हाडे यांनी पूर्वीच्या काळात सकाळी पहाटे लवकर उठून जात्यावर पीठ दळून व दगडी पाट्यावर वाटला जाणाऱ्या मसाल्याचे आणि आत्ताचे वेगळेपणाबाबत माहिती दिली. यावेळी चपटेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच शकुंतला धादवड, यशवर्धिनी संघाच्या अध्यक्ष योगिता बोऱ्हाडे, मैना चपटे, आशा बोऱ्हाडे, सरला शेळके, मेघा बोऱ्हाडे, अनिता आनंदराव, छाया चपटे, मीना धादवड, सविता चपटे, लता अंभिरे, संगीता चपटे, सुनंदा धादवड आदी बचत गटांतील महिला उपस्थित होत्या. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी संघाचे कार्यकर्ते कल्पना एरंडे, सुहास वाघ, शिवाजी शेटे, हरिभाऊ गेंगजे परिश्रम घेत आहेत.
परसबागेसाठी बक्षीसे मिळणार
यशवर्धिनी संस्था व टाटा मोटर्सच्या माध्यमातून लोकांच्या आहारात विषमुक्त भाजीपाला वाढविण्याचा या मोहिमेतून छोटासा प्रयत्न केला जाणार आहे. उत्कृष्ट परसबागेसाठी अनुक्रमे प्रथम क्रमांक पाच हजार एक रुपये, चार हजार एक, तीन हजार एक अशी रक्कम बक्षीसे म्हणून दिली जाणार आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ आंबेगाव कुमार घोलप यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.