पुणे

साबळेवाडीतील पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट

CD

शिर्सुफळ, ता : ९ : साबळेवाडी (ता. इंदापूर) परिसरातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. त्याचे काम निकृष्ट व योग्य पद्धतीने न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे शनिवारी (ता. ४) बारामती दौऱ्यावर असताना तक्रार करण्यात आली.
मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार विनोद गुळमकर, दत्तू गुळुमकर, बाळासाहेब गाडेकर, दत्तू पानसरे, नवनाथ गाढवे, सुरेश भापकर, दिलीप भापकर, सचिन भापकर यांनी पवार यांच्याकडे केली आहे. पवार यांनी या योजनेसाठी चार कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. हे काम अंदाजपत्रकानुसार ४.२५ फूट खोदाई होणे अपेक्षित असताना देखील ठेकेदाराने दोन फूट खोदाईतच जलवाहिनी बुजविली असल्याची तक्रार अजित पवार यांच्याकडे करण्यात आली होती. दरम्यान, अजित पवार यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, गटविकास अधिकारी अनिल बागल यांच्याशी साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

तक्रारदारांना ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित राहण्यासाठी पत्र दिले होते, परंतु एकही तक्रारदार उपस्थित राहिलेले नाहीत. मी कामाची पाहणी केली आहे. सध्या जे काम मला दिसते आहे ते चांगले काम आहे. ज्यांना कोणाला वाटत असेल त्यांनी दाखवून द्यावे की काम कुठे निकृष्ट आहे. सबळ पुरावे असतील तर कामाची दुरुस्ती करून देण्यात येईल.
-अमित आडे, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग, बारामती


02977

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT