पुणे

कोपीवरच ऊसतोडणी मजुरांना आरोग्य सुविधा

CD

इंदापूर ता.१८ : इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना क्षेत्रातील ऊसतोडणी मजुरांना यंदा शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यामातून उसाच्या फडात, राहत्या कोपीवरच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील ६६ गावातील ३ हजार १५० ऊसतोडणी मजुरांनी आरोग्याची तपासणी करण्यात आली. या उपक्रमाचे संपूर्ण कौतुक होत आहे.

चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पद्मा भोसले यांच्या प्रयत्नातून आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना, महात्मा फुले नगर, बिजवडी या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ६६ गावाच्या परिसरातील विविध ठिकाणी ऊसतोड निमित्त राहणाऱ्या ३ हजार १५० मजुरांची मोफत आरोग्य तपासणी फिरत्या दवाखान्या मार्फत करण्यात आली. तसेच ६ वेळा कारखान्याच्या परिसरातील ऊसतोड मजुरांच्या वसाहतीमध्ये मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
यासह कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त कारखान्यातील १२६ कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. दरम्यान, प्रत्येक आरोग्य तपासणी वेळी गावाच्या परिसरातील कारखान्याचे संचालक, कारखान्याचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मयोगीच्या शेतकी विभागाचे कर्मचारी वर्गाचे मोठे सहकार्य लाभले. त्याचबरोबर गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, टोळी मालक, शेतकरी, कर्मयोगीचे सभासद, सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.
उपक्रमासाठी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्मा भोसले, संस्थेचे सचिव डॉ.गिरीश देसाई, संस्थेचे खजिनदार तुषार रंजनकर, संस्थेचे विश्वस्त अरविंद गारटकर यांच्या सूचनेनुसार चॅरिटेबल ट्रस्टचे दीपक जगताप, अमोल राऊत, आरोग्य केंद्राच्या डॉ.सारंगी कुंभार, परिचारिका गौरी राठोड, सानिका फुलारी, वार्ड बॉय रणजित साठे, केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण, शिवाजीराव गोफणे या सर्वांच्या सहकार्यातून ही आरोग्य तपासणी यशस्वीपणे पूर्ण झाली.
-
03060

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT