पुणे

शिरसाई देवीची यात्रा आजपासून

CD

शिर्सुफळ, ता. २२ : बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील श्री शिरसाई देवीची यात्रा २३ आणि २४ एप्रिल रोजी होणार आहे. यात्राकाळात गटागटांमध्ये तेढ निर्माण होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याबाबत काळजी घ्यावी अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिला.

यात्रोत्सवानिमित्त तालुका पोलिस ठाण्याच्या वतीने मोरे यांनी सर्व यात्रेकरू व भाविकांना सूचना दिल्या. ते म्हणाले, ‘‘यात्राकाळात सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. सर्व स्टॉलधारकांनी आपल्या दुकानांसमोर गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. आवश्यक सुरक्षासाधनांचा वापर करावा. यात्रेमध्ये चोर, पाकिटमार व संशयित फिरताना आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी. मौल्यवान वस्तू व लहान मुलांची काळजी घ्यावी. यात्रेतील तमाशामध्ये कोणीही बेशिस्त वर्तन करून वादावादी करणे तसेच कलावंतांना विनाकारण त्रास देणे असे प्रकार केल्याचे आढळून आल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याकाळात दोन पोलिस अधिकारी तसेच पंचवीस पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर असतील.’’ यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यास पोलिसांना सर्वांनी सहकार्य करावे,’’ असे आवाहनही या वेळी मोरे यांनी केले. यात्रोत्सवाची तयारी पूर्णत्वास आली असून, या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आल्याचे सरपंच अप्पासाहेब आटोळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

AI Superintelligence Race: AI माणसांना संपवू शकतो; Anthropic च्या संशोधकाने राजीनामा देत दिला गंभीर इशारा!

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

SCROLL FOR NEXT