इंदापूर, ता.१४ : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून इंदापूर शहरातील अकलूज मार्गावरील श्रीराम चौक येथे उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाचे स्वसंरक्षण कठडे तुटले आहे. याबाबत तत्काळ लक्ष देण्याची मागणी इंदापूरकरांकडून होत आहे.
भारताच्या संविधानाप्रती जागरूकता निर्माण व्हावी, भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी या भावनेतून तसेच संविधान व लोकशाही व्यवस्थेप्रती सजग नागरिक घडविण्यासाठी व संविधानाचे स्मरण राहावे या उद्देशाने बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून मतदार संघातील नगरपालिका, नगरपरिषदा आणि महापालिकेच्या क्षेत्रात संविधान स्तंभ उभारले आहेत. हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी असून तो राज्यभरात राबविण्याची मागणीही त्यावेळी करण्यात आली होती.
धर्तीवर इंदापूर शहरात उभा करण्यात आलेल्या संविधान स्तंभाच्या संरक्षक कठड्याचे पाइप तुटल्याने बाहेर आले आहेत. काही दिवसापूर्वी त्यास दोरीने बांधून आधार देण्यात आला होता. मात्र, आता ती दोरीही तुटली आहे. यामुळे याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
-
03745
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.