पुणे

इंदापूर येथे बसस्थानकातून महिलेच्या दागिन्यांची चोरी

CD

इंदापूर, ता. ७ : पुणे आणि सोलापूर मार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंदापूर येथील बस स्थानकांवर सुरू असलेल्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून, शनिवारी (ता. ४) एका महिला प्रवाशाच्या पर्समधील दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारत तब्बल ३ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
या घटनेबाबत नाझिया आसिफ कुरेशी (वय २६, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) यांनी इंदापूर पोलिस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान मोहोळ (जि. सोलापूर) येथे जाण्यासाठी बहीण इर्शाद कुरेशी (रा. इंदापूर) हिचे घरून इंदापूर बसस्थानक येथे आले. त्यावेळी बसस्थानक येथे खूप गर्दी होती. दुपारी साडेतीन वाजता तुळजापूर बसमध्ये चढून बसमध्ये जाऊन बसल्या. बस इंदापूर बसस्थानक येथून निघून सरडेवाडी टोलनाक्याचे पुढे गेली. त्यावेळी पर्स उघडुन पाहिली असता पर्समध्ये ठेवलेला दागिन्यांचा बॉक्स दिसला नाही. दागिन्यांचा बसमध्ये शोध घेतला, परंतु मिळून न आल्याने दागिने चोरी झाल्याबाबत वाहकाला सांगितले. त्यानंतर बस टेंभुर्णी पोलिस ठाणे येथे नेली. त्यानंतर टेंभुर्णी पोलिसांनी बसमध्ये दागिन्यांचा शोध घेतला असता दागिने मिळून आले नाहीत. त्यामुळे इंदापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यामध्ये १ लाख २० हजार व ८० हजार रुपये किमत, असे दोन सोन्याचे गंठन, ८० हजार रुपये किमतीचा सोन्याचे नेकलेस, ८० हजार रुपये किमतीचे कानातले पत्ता झुबे, वेल, २२ हजार रुपये किमतीचे पत्ता मनके, असे एकूण
३ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. यावरून अज्ञात व्यक्ती विरोधात इंदापूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT