इंदापूर, ता. ३ : विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज इंदापूर येथे माजी विद्यार्थी मेळावा पार पडला. दरम्यान, या मेळाव्यास १०० हून अधिक माजी विद्यार्थी सहभागी झाले.
या वेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी कॉलेजला सात प्रोजेक्टर व त्याला लागणारे स्क्रीन भेट देण्याची ग्वाही दिली. यामुळे कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांना सध्या इंडस्ट्रीजमध्ये ज्या नवीन पद्धती अवलंबल्या जातात, त्या शिकण्यासाठी त्याचा खूप उपयोग होईल व ते कौशल्य चांगल्या प्रकारे आत्मसात करू शकतील.
या वेळी प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कॉलेजमध्ये सायबर सेक्युरिटी सेंटर ऑफ एक्सलन्स, इंक्युबॅशन लॅब व इनोवेशन क्लब सुरू करण्याबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मीकांत लाकाळ यांनी केले. आभार अभिजित काशीद यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.