पुणे

‘कुरण सफारी’ची निसर्गप्रेमींना पर्वणी

CD

समीर बनकर (शिर्सुफळ, ता. बारामती)

बारामतीहून कटफळ मार्गाने शिर्सुफळकडे जाता तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेला हिरव्या-सोनेरी गवताचा सागर तुमच्या डोळ्यांचे पारणे फेडतो. पावसाळ्यात हिरवे, हिवाळ्यात तपकिरी आणि उन्हाळ्यात पिवळे-सोनेरी होणारे हे गवताळ माळरान आता पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. ‘कुरण सफारी’साठी राज्यभरातील निसर्गप्रेमींमध्ये प्रसिद्ध होत आहे. बारामती तालुक्यातील केवळ शिर्सुफळच नव्हे, तर गाडीखेल, साबळेवाडी, पारवडी, पणदरे, सोनकसवाडी, मुढाळे, म्हसोबावाडी, कटफळ, उंडवडी कडेपठार, कारखेल, दंडवाडी, सोनवडी सुपे, नारोळी, कोरोळी, खराडवाडी, उंडवडी सुपे हा परिसरात गवत कुरणाने व्यापला आहे. बारामती तालुक्यातील एकूण २ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून २० ठिकाणी गवती कुरण आढळून येते. हा भाग जैववैज्ञानिकदृष्ट्या ‘सवाना’ प्रकारच्या काटेरी वनात मोडतो.

गवताचे फायदे
जमिनीची धूप थांबवते, मातीची सुपीकता टिकवते, दाट जाळ्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते; भूजलपातळी वाढते. पक्ष्यांना घरट्याची उत्तम सामग्री मिळते (विशेषतः सुगरण, तुरेवाज चंडाल व चिमण्या)
फुलपाखरे, मधमाश्या, सरपटणारे प्राणी यांना नैसर्गिक आश्रय. अनेक औषधी वनस्पती (दूर्वा, नागरमोथा, बेहडा आदी)

या गवतांच्या प्रजातींचा विस्तार
मारवेल, शेडा, डोंगरी गवत, सफेद कुसळी, काळी कुसळी, घाट्या, दीनानाथ, भालेगवत, गोधडी

गवताळ परिसरात यांचा मुक्त वावर
चिंकारा, ससा, लांडगा, कोल्हा, साळींदर, तरस यांच्यासह सरपटणारे प्राणी आणि कीटक मुक्तपणे फिरताना दिसतात.

गवताच्या उंच काड्यांमध्ये पक्ष्यांचे साम्राज्य
तुरेबाज चंडाल, तितर, डोंबारी चिमणी, माळमुनिया, भारतीय चंडोल, धाविक, खडकी लावा, हिवाळी गप्पीदास, शेतपिपीट, पाखरुडी, विविध टिटव्या आणि चतुर

महाराष्ट्राची ‘मिनी सवाना सफारी’
शिर्सुफळ आणि परिसरातील गवताळ मैदाने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची ‘मिनी सवाना सफारी’ बनली आहेत. सकाळी-सायंकाळी येथे फिरायला गेल्यास चिंकारांचे कळप, माग काढणारे लांडगे, कोल्हे, आकाशात चक्कर मारणारे गरुड आणि गवतात लपलेले तुरेबाज चंडाल यांचे दर्शन हमखास होते. फक्त हे सौंदर्य आणि जैवविविधता टिकवण्यासाठी बारामतीकरांनी फक्त एक गोष्ट करायची आहे, गवत जळू देऊ नका, परदेशी झाडे लावू देऊ नका. कारण गवत हा केवळ चारा नाही, तो बारामतीच्या माळरानाचा जीव आहे, असे आवाहन वन विभागाचे वनपाल संतोष उंडे यांच्यासह पर्यावरण प्रेमी व अभ्यासकांनी केले आहे.

उन्हाळ्यात दरवर्षी शेकडो हेक्टर गवत जळून खाक होते. यंदा आम्ही नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये सर्व गवताळ क्षेत्रात १०-१५ मीटर रुंद ‘वणवा संरक्षण पट्टे’ काढत आहोत. शाळा-महाविद्यालये, ग्रामपंचायत, युवक मंडळे यांच्याबरोबर जनजागृती मोहीम राबवत आहोत. याशिवाय परदेशी झाडे उपटून मूळ गवतालाच प्राधान्य देण्याचे धोरण राबवत आहोत.
- अश्विनी शिंदे, बारामती वन परिक्षेत्र अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election 2025: पुण्यातल्या भाजप-शिवसेना युतीची इनसाईड स्टोरी; 'त्या' 15 जणांची नावं आली समोर, शिवसेनेने 140 एबी फॉर्म वाटले

Sassoon Hospital : आईच्या किडनीदानातून मुलाला नवे जीवन; ससून रुग्णालयामध्ये ३५ वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया!

Maharashtra Teacher Recruitment : आता शिक्षक भरतीची प्रक्रिया 'परीक्षा परिषदेमार्फतच' होणार; उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त!

India Economy: गुड न्यूज! भारत बनला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकलं मागे, GDP किती?

Latest Marathi News Live Update : पुण्यात आणखी एका गुंडाने भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT