पुणे

तेवीस वर्षांनी साकारले बारावीचे यश

CD

सोमेश्वरनगर, ता. २७ : सोमेश्वर इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि पळशी (ता. बारामती) गावचे माजी सरपंच बाबा रामा चोरमले यांनी वयाच्या चाळीसाव्या वर्षी बारावीच्या परीक्षेत ८७.८३ टक्के गुण मिळवून यश मिळविले आहे. न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर विद्यालयात २००० मध्ये दहावीत ते चांगल्या गुणांनी यशस्वी झाले होते. आता तेवीस वर्षांनी बारावीतही यश पटकाविले आहे.
चोरमले यांनी सातवीपर्यंत पळशीत तर दहावीपर्यंत न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर येथे शिक्षण घेतले. २००० मध्ये दहावीत ७८.५३ टक्के गुण प्राप्त केले होते. त्यानंतर त्यांचे शिक्षण थांबले.
२००७ मध्ये ग्रामपंचायत सदस्यपदी त्यांची निवड झाली. २०१० मध्ये ते उपसरपंचपदी निवडून आले. १२ वीचे शिक्षण राहून गेल्याची हुरहूर लागल्याने अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर त्यांनी १२ वीचे शिक्षण पूर्ण केले.
गावकऱ्यांच्या आग्रहावरून थेट जनतेतून सरपंचपदासाठी ते निवडले गेले होते. त्यांनी २०२२ पर्यंत गावचे सरपंचपद सांभाळले. सरपंचपदावरून पायउतार झाल्यावर स्वयंरोजगार सुरू केला. मात्र बारावी राहून गेल्याची खंत मनात होती. न्यू इंग्लिश स्कूलमधून सतरा नंबरचा फॉर्म भरला आणि आता मराठी ८९, इंग्रजी ८०, हिंदी ९०, इतिहास ९२, भूगोल ८७, राज्यशास्त्र ९० असे घवघवीत गुण मिळविले. याबद्दल शाळेचे अध्यक्ष बाबासाहेब भापकर, सचिव बाळकृष्ण भापकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विजयसिंह भापकर, माऊली भापकर, त्रिंबक भापकर, संजय भापकर, संदीप जगताप उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT