पुणे

मुरूम, शेंडकरवाडी परिसरात लोकवस्तीत दुपारी घरफोडी

CD

सोमेश्वरनगर, ता. १४ : बारामती तालुक्यातील मुरूम व शेंडकरवाडी या दोन ठिकाणी मंगळवारी (ता. १४)दुपारच्या सुमारास चक्क लोकवस्तीतील घरफोडी करण्याचे धाडस चोरट्यांनी केले. मुरूम येथे एका घरातून सोने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली, तर शेंडकरवाडी येथे चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
मुरूम येथील सुनील बापूराव काळे यांचे नीरा नदीच्या काठाला असलेले बंद घर दुपारी दोनच्या सुमारास चोरट्यांनी फोडले. दारावरचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील नवीन कपाटाचे लॉकर तोडले. त्यातून अडीच तोळ्याचा गंठण, जोडवी, तीन छल्ले, तीन नथ व पाच हजार रुपये रोख, अशी रक्कम चोरट्यांनी लंपास केली, अशी माहिती काळे यांनी दिली. तर, तिथून सहा-सात किलोमीटर अंतरावरील शेंडकरवाडी येथे दुपारी चार वाजता दत्तात्रेय आबूराव चोरगे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाट खोलून घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त केले, परंतु हाती काही लागले नाही. दुसऱ्या खोलीचे कुलूप तोडण्यात त्यांना अपयश आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना! १४ जानेवारी ते १७ जानेवारीपर्यंत वाहतूक निर्बंध लागू; कुठे आणि पर्यायी मार्ग काय? जाणून घ्या...

U19 World Cup: आयुष म्हात्रेची टीम इंडिया सहाव्यांदा जगज्जेता होण्याच्या इराद्याने खेळणार; Live Streaming कुठे दिसणार?

SBI Scheme : SBI ची ही योजना तुम्हाला माहिती आहे का? रोज फक्त ₹20 गुंतवून तुम्ही 1 लाख रुपये बनवू शकता; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Latest Marathi News Live Update : पतंग उडवताना विजेचा धक्का; पिंपरी-चिंचवडमधील १४ वर्षीय मुलाने गमावला जीव

Election 2026: मुंबई आणि पुण्यात मतदान केल्यावर मोफत ‘फ्राईज’! ऑफर कुठे अन् कशी मिळणार? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT