पुणे

शहाजीराव काकडे यांना उच्च न्यायालयात जामीन

CD

सोमेश्वरनगर, ता. २७ : शर्यतीच्या बैलाच्या वादावरून निंबूत (ता. बारामती) येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी अटकेत असलेले सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांना मंगळवारी (ता. २७) मुंबई उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला.
फलटण येथील बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांचा सुंदर नावाचा बैल शहाजीराव काकडे यांचे ज्येष्ठ पुत्र गौतम काकडे यांनी ५ लाख इसार (ऍडव्हान्स) देऊन घेतला होता. उरलेली रक्कम नेण्यासाठी गुरुवारी २७ जून रोजी रात्री अकरा वाजता निंबाळकर हे पत्नी व अन्य सहकाऱ्यांसह काकडे यांच्या निवासस्थानी निंबूत येथे आले होते. याप्रसंगी झालेल्या वादावादीनंतर निंबाळकर यांच्यावर गौतमचे बंधू गौरव याने गोळी झडली. शनिवारी २९ जूनला त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात काकडे पिता-पुत्र व अन्य तीन, अशा एकूण सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
शहाजीराव काकडे यांचे ‘एफआयआर’मध्ये त्यांचे नाव नव्हते, मात्र गोळीबारातील पिस्तूल परवाना त्यांच्या नावे होता, तसेच पुरावे नष्ट करण्याचा आरोपही त्यांच्यावर पोलिसांनी ठेवला होता. याप्रकरणी बारामती न्यायालयाने काकडे पिता-पुत्रांसह सर्व सहा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. शहाजी काकडे यांचा मांडलेला जामीन बारामती जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जामीन मागण्यात आला होता. यावर सुनावणी पार पडल्यावर उच्च न्यायालयाने आज जमीन मंजूर केला. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हर्षद निंबाळकर व ॲड. धैर्यशील जगताप यांनी युक्तिवाद केला. सरकारी पक्षाकडून ॲड. पंकज देवकर यांनी मांडली.
ॲड. धैर्यशील जगताप म्हणाले, ‘‘एफआयआरमध्ये काकडे यांचे नाव नव्हते, तसेच प्रत्यक्ष घटनेत कुठल्याही प्रकारचा सहभाग नव्हता. फक्त हत्यार परवाना नावे आहे, अशी बाजू मांडल्याने उच्च न्यायालयाने नियमित जामीन आज मंजूर केला.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'दुचाकीवर स्वामी अन्...' देऊळ बंद २ चं पहिलं मोशन पोस्टर रिलीज, स्नेहल तरडेच्या डोळ्यात अश्रू, काय असेल कथा?

इथली जागा मुडदे गाडणारी, बेचैन आत्म्यांमुळे ग्रहण; चांगल्या जागेवर इमारत बांधा, शिंदेंच्या मंत्र्याचा महापालिकेला सल्ला

Yavatmal Accident: बारा फूट खड्ड्यात बैलबंडी कोसळली; दोन शेतकरी गंभीर, बैल ठार, कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणा आला समोर!

बोलेरो पिकअप आणि ट्रकचा भीषण अपघात; ८ भाविकांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Danoli Village Bandh : माणुसकीचा हुंकार! दानोळीत सामाजिक एकोप्याचा स्वर; भरतेशच्या निधनामुळे बौद्ध समाजाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT