पुणे

गुणवंत शिक्षक पुरस्कार

CD

सोमेश्वरनगर, ता. १७ : ‘‘माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या बारामती तालुका शाखेच्या वतीने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते रविवारी हे पुरस्कार दिले जाणार आहेत,’’ अशी माहिती मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सिकंदर शेख व सचिव संदीप जगताप यांनी दिली.
सालाबादप्रमाणे मुख्याध्यापक संघाच्या वतीने तालुक्यातील शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. वाकी-चोपडज (ता. बारामती) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात रविवारी (ता. १४) सकाळी १० वाजता आसगावकर, कारेकर, उद्योजक प्रवीण भोसले, गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी, नंदकुमार सागर यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. यानिमित्ताने दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत तालुक्यात प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव होणार आहे.

पुरस्कार्थी व कंसात शाळा पुढीलप्रमाणे :
गुणवंत मुख्याध्यापक : शोभा अशोक लोणकर (मुख्याध्यापिका, शहाजी विद्यालय, सुपे), वल्लभ लक्ष्मण चौधरी (भैरवनाथ विद्यालय, उंडवडी).
गुणवंत शिक्षक-शिक्षिका पुरस्कार :
उज्ज्वला रवींद्र जगताप (उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळा, वाघळवाडी), राजेंद्र विश्वनाथ झुरंगे (सोमेश्वर विद्यालय, सोमेश्वरनगर), भारत धनसिंग भोसले (छत्रपती शाहू हायस्कूल, बारामती), नवनाथ दिलीप कुंभार (शारदाबाई पवार विद्यालय शिवनगर), अल्लाबक्ष हुसेन शेख (वसतिगृह विद्यालय, काऱ्हाटी), रोहिणी सुरेश टेके (छत्रपती शाहू हायस्कूल), भारत हनुमंत काळे (देशपांडे विद्यालय, बारामती), शिंदे संदीप मानसिंग (विठ्ठल विद्यालय, भिकोबानगर), कोमल शामराव बिचकुले (विठ्ठल विद्यालय, कांबळेश्वर), पोपट मोहन वाबळे (शारदाबाई पवार विद्यालय, शिवनगर), सुनीता चिंतामणी जगताप (छत्रपती हायस्कूल, निंबोडी).

गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी :
बाळकृष्ण संपतराव भोसले (वरिष्ठ लिपिक, न्यू इंग्लिश स्कूल, पांढरवस्ती), सरिता गणेश जोशी (कनिष्ठ लिपिक, कवी मोरोपंत हायस्कूल, श्रीरामनगर), फिरोज अकबर बागवान (शिपाई, उर्दू माध्यमिक विद्यालय, बारामती).
दहावीतील गुणवंत - श्रेया विलास जगताप, सिद्धी गोरखनाथ लडकत, रिद्धी गोरखनाथ लडकत.
बारावीतील गुणवंत - श्रावणी महेश नलावडे, रोहन शशिकांत देशमुख, सृष्टी हेमंत शिंदे.
..............................................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: ३० हजारांऐवजी १५ लाख रुपये मिळणार? ८व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, ७३ प्रस्ताव सादर...

Khidrapur Kopeshwar Temple : खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात अवतरणार ‘सुपरमून’; स्वर्ग मंडपात मध्यरात्री रंगणार खगोलीय चमत्कार!

Ambaghat Tunnel Project: आंबाघाटात सात किलोमीटरचा बोगदा; अडीच हजार कोटींचा केंद्राकडे प्रस्ताव; तीन पर्यायी ‘अलाइनमेंट’ सादर

Kolhapur News: ‘गोकुळ’च्या सुनावणीसाठी ८० लाख रुपयांचे मानधन; शासनाचे आदेश,ॲड. मुकुल रोहतगी मांडणार शासनाची बाजू

रामललाच्या दर्शनासाठी नेपाळी भाविकांना, तर माता जानकीच्या दर्शनासाठी भारतीयांना प्रवास होणार सुलभ; 'सरयू-कमला एक्सप्रेस'चा शुभारंभ

SCROLL FOR NEXT