सोमेश्वरनगर, ता. २३ : येथील परिसरात दोन दिवसांत ११४ मिलिमिटर इतका दमदार पाऊस कोसळला. यामुळे शेतात पाणी साठले आहे. याचा ऊस पिकाला याचा फायदा होणार आहे. भाजीपाला व फळभाज्या पिकांना मात्र फटका बसला आहे. शेताच्या मशागतीसुध्दा खोळंबल्या असून वाफसा येण्यासाठी बरीच वाट पहावी लागणार आहे.
सोरटेवाडी-होळ येथील आघारकर कृषी संशोधन केंद्रावर मागील आठवडाभरात १३० मिलिमिटर पावसाची नोंद झाली. त्यातही गुरुवारी तब्बल ९० तर शुक्रवारी २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारीसुध्दा दुपारचा अपवाद वगळता दिवसभर पाऊस पडला. यामुळे सर्वत्र शेतात पाणी साठले होते. नीरा, जेऊर, मांडकी या पुरंदर तालुक्यातील गावांपासून सोमेश्वरनगर, होळ, कोऱ्हाळे, लाटे या ऊस पट्ट्यातील ऊस लागवडी, खोडवा या पिकांना या पावसाचा मोठा फायदा होणार आहे. तर जेजुरीपासून मुर्टी, मोरगाव, सुपे, लोणी भापकर ते अंजनगावपर्यंत जिराईत भागातील ऊस पाण्याअभावी सुकून चाललेल्या ऊस पिकाला जीवदान मिळाले आहे. शिवाय कोरड्या पडलेल्या विहिरींनाही पाणी फुटणार आहे. परंतु बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात आणि पुरंदरच्या दक्षीण-पूर्व पट्ट्यात टोमॅटो, वांगी, मिरची, गवार, कोबी, फ्लॉवर, काकडी असा पिकांसह पालेभाज्यांची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या सर्व पिकांना मात्र सततच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. आंबा आणि जांभूळ या झाडांची फळेही गळून गेली आहेत. अंजीर उत्पादकही धास्तावले आहेत.
दरम्यान, ऊस लागवडीसाठी व खरीपाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांच्या मशागती सुरू झाल्या होत्या. त्या तर खोळंबल्याच पण पुढील किमान पंधरा दिवस वाफसा येण्याची चिन्हे नाहीत.
कोथींबीर पावसाने पूर्ण केली. आमच्या भागातील कारली, काकडी, शेवंती फुले, वांगी अशी सगळी पिके संपल्यात जमा आहेत. ऊस पिकाला मात्र बरे झाले.
- पोपटराव बेलपत्रे, बागायतदार
04577
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.