सोमेश्वरनगर, ता. २७ : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) पोलिसांनी अखेर शेतकऱ्याचे कृषीपंप चोरणाऱ्या चार जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये दोन सराईत गुन्हेगार व दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पाच कृषीपंप व केबल असा सुमारे सव्वादोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याप्रकरणी अविनाश विजय काळे, अल्पेश अशोक शिंदे (रा. निंबूत- पठारवस्ती, ता. बारामती) या आरोपींना अटक केली असून, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड व सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
निंबूत (ता. बारामती) येथील शेखर काकडे यांचा कृषीपंप व केबल चोरी झाल्याची तक्रार वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे कोंबिंग ऑपरेशन राबविले. यात अविनाश काळे, अल्पेश शिंदे या सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. तसेच, दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. .
दरम्यान, तपासात निंबूत, वाणेवाडी, चौधरीवाडी, खामगळवाडी येथील शेतीपंप व केबल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, उपनिरीक्षक राहुल साबळे, दीपक वारुळे, बाळासाहेब कारंडे, अमोल भोसले, रमेश नागटिळक, सागर देशमाने, पोपट नाळे, अनिल खेडकर, भाऊसाहेब मारकड, कुंडलिक कडवळे, नीलेश जाधव यांनी ही कारवाई केली.
या कारवाईत पाच गुन्ह्यात चोरीस गेलेले पाच शेतीपंप, केबल, तांब्याची तार व कटूर असा दोन लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबद्दल गुरुवारी (ता. २७) शेतकरी कृती समितीच्या शहाजी जगताप यांनी सुदर्शन राठोड, नागनाथ पाटील, राहुल साबळे यांचा सत्कार केला. यावेळी दिग्विजय जगताप, सुजित काकडे, नंदू काकडे हे शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.