पुणे

खेळाडूंना घरबसल्या मिळणार क्रीडा-ई-प्रमाणपत्र

CD

सोमेश्वरनगर, ता. १५ : राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये पाच टक्के आरक्षणाचा लाभ दिला जातो, मात्र त्यासाठी क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी आवश्यक असते. खेळाडू आरक्षणाची सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद होण्यासाठी राज्य सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने आता क्रीडा ई-प्रमाण ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यामुळे खेळाडूंचे क्रीडा विभागाचे हेलपाटे वाचणार असून घरबसल्या क्रीडा-ई-प्रमाणपत्र मिळू शकणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह इतर सर्व शासकीय व निमशासकीय भरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता क्रीडा ई-प्रमाणपत्र प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. तर खेळाडू संवर्गातून त्याचा भरतीसाठी विचार होतो. भरतीत वापरल्या जाणाऱ्या बोगस क्रीडा प्रमाणपत्रांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी आता क्रीडा विभागाने अद्ययावत प्रणाली तयार केली आहे. एखाद्या खेळाडूने संकेतस्थळावर माहिती भरली आणि ती माहिती मूळ डेटाशी जुळली तर अवघ्या २४ तासांच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल घरबसल्या मिळणार आहे. त्या प्रमाणपत्रावर असणाऱ्या क्युआर कोडमुळे नोकरभरती करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही पडताळणी सोपी होणार आहे.
पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे म्हणाले, ‘‘नव्या प्रणालीअंतर्गत क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर सर्वात खाली पाच टक्के आरक्षणाचा टॅब उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये क्रीडा-ई-प्रमाण पोर्टलवर खेळाडूंनी वैयक्तिक माहिती, आधार-संलग्न भ्रमणध्वनी क्रमांक, ओळखपत्र, ई-मेल, आधारकार्डची पीडीएफ व क्रीडा स्पर्धेतील प्राविण्य प्रमाणपत्र अपलोड करावे. पोर्टलवर मान्यताप्राप्त संघटनांचे क्रीडा स्पर्धांचे अभिलेख अपलोड करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे खेळाडूंच्या अर्जाची सत्यता पडताळणी सोपी होणार आहे.’’ एखाद्या खेळाडूच्या स्पर्धेचे अभिलेख उपलब्ध नसल्यास Grievance या टॅबद्वारे अर्ज करावेत. अन्य अडचणींबाबत support@kridaepramaan.org या ई-मेलवर क्रीडा प्रमाणपत्र व अचूक माहितीसह तक्रार नोंदवावी. ज्या खेळाडूंनी यापूर्वी क्रीडा विभागाच्या विभागीय उपसंचालकांकडून प्रमाणपत्रांची पडताळणी केलेली आहे, त्यांनी देखील नव्या प्रणालीद्वारे प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे. https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT