पुणे

शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करा

CD

शेटफळगढे, ता १५ : ‘‘अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती, नवनवीन रोग, किडीचा प्रादुर्भाव, पाण्याचे दुर्भिक्ष, वेळेत तज्ज्ञांचा न मिळणारा सल्ला, अशा बाबींमुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा,’’ असे मत बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

निरगुडे (ता इंदापूर) येथे बारामती ॲग्रो व ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पीक परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांचा पैसा, श्रम व वेळेची बचत व्हावी म्हणून शेती क्षेत्रात ‘एआय’चा वापर केला जाणार केला जात आहे. शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अचूक हवामान खत व्यवस्थापन व पाणी वापराचा सल्ला मिळणार आहे. त्याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आपले उत्पादन वाढवण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शेतीमध्ये पाण्याबरोबरच कीड व औषध याचं नियोजनही महत्त्वाचा असल्याने या तंत्रज्ञानामधून हे शेतकऱ्यांना सहजरित्या उपलब्ध होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ही सुविधा अल्पदरात मिळण्यासाठी बारामती ॲग्रो च्या वतीने काही प्रमाणात मदतही केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असेही पवार यांनी सांगितले.
यावेळी शेतकऱ्यांना बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाची माहिती दिली. ठिबक सिंचनाचा वापराची माहिती दिली.
यावेळी शिवाजी वाकडे, विजय काळे, प्राध्यापक संजय वणवे, महादेव वाकडे, सुरेश चांदगुडे, दादासाहेब भोसले, दत्तात्रेय काजळे, बापूराव काजळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


01505

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyan Bharatam Yojana: आता भारताचा भाषिक वारसा संरक्षित होणार! नव्या योजनेची घोषणा, 'ज्ञान भारतम' योजना म्हणजे नेमकी काय?

Video: हेच खरंखुरं स्वातंत्र्य! पुणे महागनर पालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

Latest Marathi News Live Updates : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठीतून खास शुभेच्छा,पाहा एकापेक्षा एक सुंदर मॅसेज

Independence Day: ...म्हणून देश एकसंध राहिला, नाहीतर...; इतिहास सांगत काँग्रेस नेते मोदींना नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT