पुणे

सोनवडी सुपे येथील तरुणांची आरोग्यदान चळवळ

CD

सुपे, ता. २ ः देशातील उद्याचा युवक सुदृढ असावा यासाठी सोनवडी सुपे (ता. बारामती) येथील युवक द टुमारो ग्रुपच्या माध्यमातून व्यायामाविषयी जनजागृती करीत आहे. परिसरातील तरुणांचा व्यायामासाठी सहभाग वाढला आहे. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा... हे संत तुकोबारायांचे वचन अंगीकारून येथील तरुणांनी नियमित व्यायामातून करीत आहेत. या उपक्रमाबद्दल तरुणांचे कौतुक होत आहे.
अलीकडे आहार- विहाराचे संतुलन बिघडल्याने लठ्ठपणा व आजाराचे प्रमाण वाढले आहे. तंदुरुस्त शरीर व सुदृढ आरोग्यासाठी व्यायामाची मोठी गरज आहे. वजन कमी करण्यासाठी शुल्क भरून सोशल मीडियाद्वारे व्यायाम करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र, या ग्रुपच्या तरुणांनी परिसरातील युवकांना व्यायामासाठी आवाहन करून विनाशुल्क व्यायामाचे सामुहिक धडे देत एक आरोग्यदान चळवळ सुरू केली आहे.
आजच्या ताणतणावाच्या, धकाधकीच्या जीवनात व्यायामाची मोठी गरज आहे. ग्रुपमधील तरुणांची व्यायामाची दिनचर्या केवळ शारीरिक तंदुरुस्तीपुरती मर्यादित नाही, तर मानसिक शिस्त, एकमेकांशी जुळलेली सुसंवादाची नाती आणि गावासाठी आदर्श ठरणारी एकजूट याचाही समावेश आहे. वेगवेगळ्या वयोगटातील तरुण एकत्र आल्यामुळे विचारांची देवाण- घेवाण होते. यातून सर्व धर्म समभाव, सामूहिक जबाबदारीचे भान वाढते, अशी माहिती विजय मोरे, महादेव वावगे यांनी दिली. गावातील तरुणांची ही एकत्रित धाव सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे, हे द टुमारो ग्रुपने सिद्ध केल्याची माहिती ग्रुपचे आधारस्तंभ भाऊसाहेब मोरे यांनी दिली.

पोलिस भरतीसाठी तरुणांची तयारी
या गावात गेल्या पाच वर्षांपासून व्यायामाची परंपरा जोपासली जात आहे. सुमारे २२ तरुणांनी एकत्र येऊन व्यायामाचा ध्यास घेतला आहे. भल्या सकाळी ठरलेल्या वेळेला युवक एकत्र येतात आणि व्यायाम सुरू होतो. व्यायाम, स्ट्रेचिंग, शक्तिवर्धक कसरती अशा विविध प्रकारचे व्यायाम करतात. दिवसाआड पाच किलोमीटर धावणे, चौथ्या रविवारी १० ते १५ किलोमीटरपर्यंत धावण्याच्या सरावाबरोबरच अन्य व्यायाम प्रकारही घेतले जातात. परिणामी, शारीरिक ताकद वाढून, रोगप्रतिकार क्षमता व मानसिक बळ वाढते. तसेच, पोलिस भरतीसाठीचा सराव काही युवक करीत असून, काहींनी आगामी मॅरेथॉनसाठी विशेष तयारी करत असल्याची माहिती दिली.

02199

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Updates : ऑक्टोबर हिट गायब, राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता, ५ दिवस यलो अलर्ट

Maharashtra Crime : ती असुरक्षितच; साताऱ्यामध्ये महिला डॉक्टरने संपवली जीवनयात्रा, मुंबईमध्ये प्रेयसीला मारत प्रियकराने जीवन संपविले

पहिल्यांदाच असे झाले! सोलापूर बाजार समितीत स्थानिक नव्हे परजिल्ह्यातील कांदा; नवा कांदा प्रतिक्विंटल 1200 रुपये तर जुन्या कांद्याला 2500 रुपयांपर्यंतच भाव

Marriage Numerology : कितीही भांडण-मनभेद झाले तरी 'या' मूलांकाच्या लोकांचं लग्न टिकतंच..! पाहा तुमचा मूलांक

Bihar Elections : जामिनावर असलेल्यांवर जनतेचा विश्वास नाही; यादव कुटुंबावर पंतप्रधान मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT