पुणे

रांजणगावात महागणपतीच्या दर्शनासाठी गर्दी

CD

शिरूर, ता. ७ : गुलाबी रंगाचा भरजरी पोषाख... त्यावर सोनेरी शेला... हिरेजडीत सुवर्णमुकूट आणि हिरेमाणकांनी जडीत शाही हार... मकरंद, गुलाबाच्या फुलांनी गुंफलेल्या दुर्वांच्या माळा... मुख्य गाभाऱ्यातील मोगऱ्याच्या फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे महागणपतीचे दर्शन आणखी मंगलमय झाले...!
रांजणगाव येथे महागणपतीच्या दर्शनासाठी संकष्टी चतुर्थीनिमित्त सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. शाळा सुरू होण्यास चार-पाच दिवस उरल्याने अनेक पालक मुलाबाळांसह महागणपतीच्या दर्शनासाठी आले होते. पहाटे पाच वाजता अभिषेक झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. मंदिर परिसरात सकाळी सात वाजता झालेल्या अथर्वशीर्ष पठण सोहळ्यात स्थानिकांसह शेकडो गणेशभक्त सहभागी झाले होते.
श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी गणेशस्तोत्र व अथर्वशीर्षाचे पूजन केले. दुपारी १२ वाजता, आरतीनंतर मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा करून महानैवेद्य दाखविण्यात आला. देवस्थानचे उपाध्यक्ष संदीप दौंडकर, खजिनदार विजय देव, पुजारी प्रसाद कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी, उद्योजक दत्तात्रेय पाचुंदकर आदी यावेळी उपस्थित होते. प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. महागणपती भजनी मंडळाने दिवसभर मंदिर परिसरात भजने व गणेश स्तुतीपर गीते सादर केली.
भाविकांसाठी दिवसभर खिचडीचा प्रसाद, केली वाटप करण्यात आले. उन्हाच्या तीव्र झळा लागत असल्याने मंदिर परिसरात व दर्शन रांगेवर भाविकांसाठी मंडप करण्यात आला होता.

02513

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT