पुणे

शाळा ‘भेट’ शिक्षणविस्तार अधिकाऱ्यांना महागात

CD

शिरूर, ता. २ : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शाळा भेटीसाठी गेलेल्या शिक्षणविस्तार अधिकाऱ्यांना दोघा शिक्षकांनी, ‘तू आलास आता बस. तुला चहापाणी करतो, तुझा मोठा सत्कार करतो,’ असे म्हणत संबंधित अधिकाऱ्याला मुख्याध्यापक कक्षात कोंडले. पायावर पाय ठेवून बळजबरीने खुर्चीत बसवले आणि अखेरीस त्यांचा मोबाईल हिसकावून घेत त्यांना ‘तुला आता इथेच मारून टाकतो,’ अशी धमकी देत बेदम मारहाण करून हाकलून दिले.

शिरूर तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान, या गंभीर प्रकाराची दखल घेत महेश आनंदराव काळे व कैलास फक्कड पाचर्णे या शिक्षकांना मंगळवारी (ता.२) तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस केंद्रातील दत्तनगर जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी (ता. २८) हा प्रकार घडला. याबाबत विस्तार अधिकारी (शिक्षण) रघुनाथ बजाबा पवार यांनी दिलेल्या लेखी अहवालावरून तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेल्या संभाषण व चित्रफितीच्या आधारे काळे व पाचर्णे या शिक्षकांवर गटविकास अधिकारी महेश डोके यांनी मंगळवारी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. या प्रकाराबाबत कमालीची गुप्तता बाळगल्याने घटनेतील गूढ वाढले आहे. शिक्षक संघटनांच्या दबावाच्या धोसऱ्याने प्रशासनाने; तर बदनामी टाळण्यासाठी शिक्षकवर्गातून या घटनेबाबत मौन बाळगले जात आहे.

विस्तार अधिकारी पवार यांनी पंचायत समितीला सादर केलेल्या अहवालानुसार, ते शुक्रवारी रांजणगाव सांडस केंद्रातील दत्तनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भेट व तपासणीसाठी गेले होते. त्यांनी शाळेत प्रवेश करताच महेश काळे व कैलास पाचर्णे या शिक्षकांनी त्यांना दमदाटी आणि अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ सुरू केली. पवार यांनी शिक्षकांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, ‘चल तू आलाय ना, मग मुख्याध्यापकांच्या कक्षात बसू, तुला चहापाणी करतो, सत्कार करतो’ असे म्हणत या शिक्षकांनी त्यांना बळजबरीने मुख्याध्यापकांच्या कक्षात नेले. कक्षाचा दरवाजा लावून घेत खुर्चीत पायावर पाय ठेवून बसण्यास धमकावले. त्यामुळे भेदरलेल्या पवार यांनी मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रीकरण करण्यास सुरुवात करताच शिक्षक आणखीच चिडले. काळे हे त्यांच्यावर धावून गेले व त्यांचा मोबाईल हिसकावून घेत टेबलवर जोरात आपटला. त्यातूनही शांत न झालेल्या या शिक्षकांनी पवार यांना मारहाण, शिवीगाळ केली. ‘निघ इथून नाहीतर इथेच मारून टाकतो,’ अशी धमकी देत हाकलून दिले.


या प्रकाराने भेदरलेल्या पवार यांनी या घटनेबाबत पंचायत समितीकडे लेखी अहवाल सादर केला असून, मोबाईलमधील संभाषण व चित्रफीतदेखील सादर केली आहे. गटविकास अधिकारी डोके यांनी याबाबत गंभीर दखल घेत काळे व पाचर्णे या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असताना आणि शाळा सुरू झाल्या. शाळांना भेटी देऊन पाहणी करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या असून, त्यानुसार प्रत्येक शाळांना भेटी देऊन पाहणी करण्याची मोहीम पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत सुरू केली आहे. त्याअंतर्गत पवार हे शाळा तपासणीसाठी गेले असताना हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.


विस्तार अधिकारी (शिक्षण) रघुनाथ पवार हे प्रथमच दत्तनगर येथे शाळा भेटीसाठी गेले होते. त्यांची पार्श्वभूमी त्रास देण्याची नाही. तरीही हा प्रकार घडल्याने गंभीर दखल घेतली आहे. पवार यांनी लेखी अहवालासोबत मोबाईलमधील संभाषण व चित्रफीत सादर केली असून, चित्रफितीचे अवलोकन करता या शिक्षकांची त्यांच्यासोबतची वागणूक कशी, असेल याचा स्पष्ट अंदाज येतो. संबंधित शिक्षकांची व्हिडिओतील वाक्ये देखील आक्षेपार्ह
असल्याने त्यांनी पवार यांच्याशी केलेले गैरवर्तन स्पष्ट होते. त्यातूनच संबंधित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली.
- महेश डोके, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, शिरूर

शिक्षकांची पार्श्वभूमी वादग्रस्त
त्या शिक्षकांची पार्श्वभूमी वादग्रस्त असून यापूर्वीही त्यांच्याबाबत अनेकदा पंचायत समितीकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापूर्वीही या शिक्षकांनी एका शिक्षकाला तसेच केंद्र प्रमुखाला मारहाण केली होती. मात्र, पुढे प्रकरण वाढताच माफी मागून प्रकरण मिटविले. मंगळवारी विस्तार अधिकाऱ्याला मारहाण करण्यापर्यंत या शिक्षकांची मजल गेली. उद्या गटविकास अधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते शिवीगाळ, दमदाटी करायला मागेपुढे पाहणार नाहीत, अशी चर्चा पंचायत समिती, पंचायत समितीच्या शिक्षण विभागात दिवसभर रंगली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून अम्पायरसोबत वाद Video

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT