पुणे

रांजणगाव सांडस खूनप्रकरणी पतीच आरोपी

CD

शिरूर, ता. ५ : रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील शीतल स्वप्नील रणपिसे (वय २१) या विवाहितेच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेशनच्या पोलिस पथकाला यश आले असून, पत्नीच्या खुनाची फिर्याद देणारा पतीच खुनी निघाल्याने खळबळ उडाली आहे.
शीतल हिचा मृतदेह बुधवारी (ता. ३) दुपारी राहत्या घरात आढळला होता. दोरीने गळा आवळून व इलेक्ट्रीक वायरने शॉक देऊन तीचा खून झाल्याने खळबळ उडाली होती. याबाबत शीतल हिचा पती स्वप्नील श्यामराव रणपिसे (वय २६) याने, ‘आम्ही कुणी घरात नसताना अज्ञात व्यक्तीने शीतल हिचा खून केला,’ अशी फिर्याद दिली होती. त्यामुळे शिरूर पोलिसांनी गुरुवारी अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला होता.
सात महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या या नवविवाहितेच्या क्रूर पद्धतीने झालेल्या खुनाच्या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला समांतर तपासाच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी या विवाहितेवर तीच्या माहेरी पोंढे (ता. पुरंदर) येथे अंत्यसंस्कार केल्यानंतर शिरूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेशनने तपासाची चक्रे वेगात फिरवून घटनास्थळाला भेट दिली.
विवाहितेचे घर, परिसराची पाहणी केल्यानंतर आसपास चौकशी केली. त्यातून संशय बळावल्याने मृत विवाहितेचा पती स्वप्नील याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. लग्न झाल्यानंतर किरकोळ कारणावरून आम्हा पती- पत्नींत वाद होत होते. ती कायमच माझ्यावर व मी देखील तिच्यावर शंका घ्यायचो. ती नेहमी माझी इतरांशी तुलना करायची, ते मला अजिबात आवडत नव्हते. ‘बाकीचे लोक बघा कसे वागतात, तसे तुम्ही वागत नाहीत,’ असे सतत बोलत असल्याने आमचे एकमेकांशी पटेनासे झाले.
दरम्यान, बुधवारी दुपारी शीतल घरी एकटीच असताना शेतात कामाच्या निमित्ताने गेलेला स्वप्नील घरी आला. त्यावेळी स्वयंपाकगृहात दोघांत वाद झाल्यानंतर त्याने नायलॉनच्या दोरीने शीतल हिचा गळा आवळला. त्यात ती बेशुद्ध झाली. त्यानंतरही त्याने इलेक्ट्रीक वायर तीच्या अंगठ्याला गुंडाळून शॉक दिला. त्यात हाताचा काही भाग जळाला व त्यातच तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी स्वप्नील याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केला. शिरूर न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत (ता. १०) पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान, विवाहितेच्या खूनप्रकरणात रणपिसे कुटुंबातील आणखी कुणाचा सहभाग आहे किंवा कसे, याचाही पोलिस कसून शोध घेत असून, शीतल हिच्या माहेरच्या मंडळींनी तीच्या पतीवर बाहेरख्यालीपणाचा व सासू- सासऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप केल्याने त्यादृष्टीने तपास केला जात असल्याचे या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

तो आला आणि माझं आयुष्यच बदललं! रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची कबुली; शेअर केला तिच्या रोमिओचा फोटो

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

SCROLL FOR NEXT