पुणे

रांजणगावातील कोट्यवधींची जमीन हडपली

CD

शिरूर, ता. २ : तालुक्यातील रांजणगाव गणपती गावठाणातील ७२ गुंठे जमीन अपहारप्रकरणी, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी युद्ध पातळीवर तपास सुरू केला आहे. तत्कालीन ग्रामसेवक व लिपिकाला अटक केली आहे. तपासादरम्यान, जमीन हडपल्यात तत्कालीन सरपंच व श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, त्यांचे पती उद्योजक दत्तात्रेय पाचुंदकर यांचा या गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.
रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोट्यवधी रुपये किंमतीची जमीन हडपल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गेल्या महिन्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. तत्कालीन ग्रामसेवक हनुमंत लक्ष्मण चव्हाण (रा. शिरूर बायपास) व लिपिक संतोष गणपत शिंदे (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) यांना अटक केल्यानंतर, शिरूर न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. त्यांच्या पोलिस कोठडी दरम्यान, दत्तात्रेय पाचुंदकर यांच्या सांगण्यावरून बनावट नोंदी, ग्रामपंचायतीच्या दस्तऐवजांत खाडाखोडी, बनावट पान चिकटवून त्यावर अनियमीत नोंदी केल्याचे निष्पन्न झाल्याने पाचुंदकर यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.
रांजणगाव गावठाणातील कोट्यवधी रुपये किंमतीची ७२ गुंठे जागा हडपल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने याप्रकरणी कडक ताशेरे ओढल्यानंतर व तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्यानंतर ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे तक्रार करून संबंधित जमीनीचा ताबा ग्रामपंचायतीला मिळावा, अशी मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी केलेल्या चौकशीतूनही जमीन अपहार सिद्ध झाल्यानंतर विस्तार अधिकारी बाळासाहेब रामचंद्र गावडे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तत्कालीन सरपंच स्वाती पाचुंदकर, ग्रामसेवक एच. एल. चव्हाण, लिपिक संतोष शिंदे यांचा सहभाग पोलिस तपासातून निष्पन्न झाला होता. तर चव्हाण व शिंदे यांनी दत्तात्रेय पाचुंदकर यांच्या सांगण्यावरून या अनियमीत, अतिरिक्त नोंदी केल्याचे अधिक तपासातून स्पष्ट झाल्याने त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक अशोक चव्हाण पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, दत्तात्रेय पाचुंदकर यांच्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या दस्तऐवजांमध्ये संगनमताने बनावट नोंदी करून फेरफार केल्याचे प्रकरण गाजत आहे. यात सन १९६० - ६१ व सन २००८ - ०९ च्या रजिस्टरमधे फेरफार करून, खाडाखोड करून, नवीन पान चिकटवून, अतिरिक्त व अनियमीत नोंदी करून गावठाणातील ७२ गुंठे जागेवर आनंदराव दिनकर पाचुंदकर यांचे नाव नोंदविले होते. आनंदराव पाचुंदकर हे तत्कालीन सरपंच स्वाती पाचुंदकर यांचे सासरे असून, या गुन्ह्यात नूकतेच नाव समाविष्ट केलेल्या दत्तात्रेय पाचुंदकर यांचे वडील आहेत. तत्कालीन ग्रामसेवक एच. एल. चव्हाण व ग्रामपंचायतीचा लिपिक संतोष शिंदे यांना हाताशी धरून सन २०११ ते २०१३ या कालावधीत ही कोट्यवधी रुपयांची शासकीय जमीन हडपल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

PM Narendra Modi: ''घाना देशातल्या ९०० प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक'', द्वीपक्षीय संबंधांवरही मोदी स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT