पुणे

आमदार कटके बदनामीप्रकरणी शिरूरमध्ये निषेध

CD

शिरूर, ता. २४ : चौफुला येथील कलाकेंद्रावरील कथित गोळीबाराच्या प्रकरणावरून शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांची समाज माध्यमांवर नाहक बदनामी केल्याप्रकरणी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. याबाबत बुधवारी (ता. २३) रात्री उशिरा शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना निवेदन देऊन बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.
चौफुल्यावरील कलाकेंद्रावर गोळीबार व त्यात एक तरुणी जखमी झाल्याची चर्चा आहे. या गोळीबार प्रकरणात कटके यांचा किंवा त्यांच्या भावाचा काहीही संबंध नसताना त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर बुधवारी (ता. २३) काही ठिकाणांहून व्हायरल करण्यात आला. आमदार रोहित पवार यांनीही याबद्दल टिपण्णी केली. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रविकांत वर्पे यांच्या नावे पोस्ट व्हायरल करून कटके व त्यांच्या भावाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे या पोस्टमध्ये म्हटले होते.
काही समाज माध्यमांवर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट शिरूर पोलिस ठाणे गाठून कटके यांची बदनामी करणाऱ्यांचा निषेध केला. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना निवेदन देऊन आमदारांची बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची व त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, शहराध्यक्ष शरद कालेवार, युवकचे शहराध्यक्ष एजाज बागवान, क्रीडा विभागाचे शहराध्यक्ष अतुल गव्हाणे, कुंडलिक शितोळे, रंजन झांबरे, सुनील जाधव, स्वप्नील रेड्डी, रोहित पटवा, प्रवीण जामदार, अतुल जोशी आदी उपस्थित होते.
दरम्यान, आमदार कटके यांच्या बदनामीच्या प्रकारणाचा श्रीराम सेनेसह तालुक्यातील विविध संस्था, संघटनांनीही निषेध नोंदविला आहे. कटके हे जीव ओतून तालुक्याच्या विकासासाठी झटत असताना त्यांच्या विकासाच्या वाटेत अडथळे आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप श्रीराम सेनेचे संस्थापक सुनील जाधव यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! डाव्या छातीत गोळी लागली अन्..

Rohit Arya Children kidnapped : लहान मुलांना डांबून ठेवलं अन् सगळीकडे रॉकेल ओतलं! कोण आहे रोहित आर्य अन् काय होत्या मागण्या?

बनवाबनवीच्या यशाचं भूत गेलेलं डोक्यात, पण एका बादलीने सचिन पिळगावकरांना जमिनीवर आणलं, व्हिडिओ व्हायरल

Powai Children Kidnap: तब्बल ६ दिवस तो चिमुकल्यांना...; रोहित आर्यने किडनॅप करण्यापूर्वी १७ मुलांना स्वत:कडे कसे बोलावले?

Powai Children Kidnap: खळबळजनक! पवईत एका व्यक्तीनं २० मुलांना खोलीत ठेवलं डांबून अन्... असा झाला किडनॅपिंगचा थरार

SCROLL FOR NEXT