पुणे

आबा आमचे आणि आम्ही आबांचे!

CD

आबा आमचे आणि आम्ही आबांचे!

आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माउली आबा कटके हे खऱ्या अर्थाने ‘लोकनेते’ या शब्दाला साजेसं व्यक्तिमत्त्व आहे. पै. ज्ञानेश्वर या नावातून ज्ञानाची आवड, माउली आबा या नावातून मायेची ममता आणि आधार देण्याचे कर्तव्य त्यांनी नेहमी जपले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिरूर-हवेली मतदारसंघ विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे.

शिरूर-हवेलीचा आधारस्तंभ

- सुनील सहदेव गर्जे

पुणे जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघ हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा उचलणारा प्रदेश आहे. हा मतदारसंघ केवळ भौगोलिकदृष्ट्या मोठा नाही, तर येथील शेतकरी, कामगार, व्यापारी, विद्यार्थी आणि महिला या विविध घटकांनी तो समृद्ध झाला आहे. त्यामुळे, येथील जनतेचे प्रश्न आणि त्यांची जीवनशैली जशी बहुआयामी आहे, तसेच या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी लागणारी दूरदृष्टीसुद्धा वेगळी आणि व्यापक असणे गरजेचे आहे. ज्या नेत्याने या भाग्यातील जनतेला गेल्या काही वर्षांमध्ये आशेचा किरण दाखवला, विकासाला अभूतपूर्व वेग दिला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सत्तेपेक्षा जनतेशी असलेले ‘माणुसकीची नाळ’ जपली, ते तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके.
माऊली आबा कटके यांच्या रूपाने, शिरूर- हवेलीला एक असा लोकप्रतिनिधी लाभला आहे, ज्याने केवळ घोषणांवर नव्हे, तर कृतीवर आणि लोकांच्या थेट सहभागावर विश्वास ठेवला. त्यांचा राजकीय प्रवास हा सत्ता मिळवण्यासाठी नसून, सामान्य माणसाला न्याय आणि आधार देण्यासाठी केलेला संघर्ष आहे. त्यामुळेच त्यांच्या नावामागील ‘माउली’ आणि ‘आबा’ या दोन ही शब्दांना एक विशेष अर्थ प्राप्त झाला आहे, जो थेट जनतेच्या हृदयातून येतो.
‘माउली’ नावातच आपलेपण, प्रेमाचा, विश्वासाचा आणि आत्मीयतेचा संगम आहे. आमदार कटके यांच्या नावापुढे जोडलेला ‘माउली’ हा शब्द केवळ एक उपाधी नाही, तर तो जनतेच्या त्यांच्यावरील निस्सीम प्रेमाचा, अटळ विश्वासाचा आणि तीव्र आत्मीयतेचा परिणाम आहे.‘माऊली’ म्हणजे मायेसारखी ममता, अनादी जिव्हाळा, आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय केलेले वात्सल्य. ‘आबा’ म्हणजे कुटुंबाचा आधार, गरजूंना धीर देणारा कणखरपणा आणि नेतृत्वाचा ताठ कणा. या दोन भिन्न पण पूरक भावनांचा संगम माउली आबा कटके यांच्या व्यक्तिमत्त्वात आढळतो. ते लोकांसाठी नेहमी उपलब्ध, नेहमी सज्ज आणि प्रत्येक गरजेसाठी तत्पर राहणारे नेते आहेत. त्यांनी राजकारण हे समाजकारणाचे माध्यम मानले, ज्यामुळे ते सत्ताकेंद्रापेक्षा थेट जनतेच्या दारात उभे असलेले दिसतात.
पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य, शिवसेना जिल्हा प्रमुख आणि शिरूर-हवेली विधानसभा निवडणूक समन्वयक अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आणि आता ते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत विधानसभा सदस्य म्हणून शिरूर- हवेली विधानसभा मतदार संघांचे प्रतिनिधित्व करत आहेत, त्यांचे मूळ गाव वाघोली (कटकेवाडी) आणि त्यांची सामान्य जनतेशी असलेले त्यांचे नाते कधीही तुटले नाही. त्यांचा सामान्य कुटुंबातून राजकीय प्रवासाचा पाया पै. श्री. ज्ञानेश्वर ऊर्फ माउली आबा कटके यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्यात रुची होती. शेतकरी कुटुंबातील मुलगा असल्याने शेतजमिनीशी आणि मातीशी असलेले त्यांचे नाते कायम राहिले. याच जिव्हाळ्यामुळे, आजही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांच्या शब्दांत केवळ राजकीय भाषणबाजी नव्हे, तर अनुभवाची ताकद आणि आपुलकी स्पष्टपणे जाणवते. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी जवळून पाहिल्या, ज्यामुळे त्यांच्या भावी कार्यात शिक्षण क्षेत्राला विशेष महत्त्व मिळाले. त्यांचा राजकीय प्रवास हा वारसा हक्काने मिळालेला असला, तरी त्यांनी तो मेहनतीने सिद्ध केला. त्यांचे वडील श्री. पंढरीनाथ किसन कटके यांनी १९९२ आणि २००२ मध्ये वाघोली गावचे सरपंच म्हणून काम पाहिले होते. तसेच, २००२ मध्ये वडील आणि २०१२ मध्ये आई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी देखील उभ्या राहिल्या होत्या. परंतु राजकीय वारसा असला तरी माउली आबा कटके यांनी सामान्य कार्यकर्त्यापासून सुरुवात केली. स्थानिक पातळीवर युवकांना सोबत घेत त्यांनी गावोगावी संवाद साधला. जनतेच्या प्रश्नांसाठी लढताना त्यांनी अनेकदा संघर्ष केला, आणि याच
संघर्षातून त्यांना मतदारसंघातील नागरिकांचा आशीर्वाद आणि विश्वास मिळाला.
२०१७ मध्ये त्यांनी ग्रामपंचायत वाघोली सदस्य म्हणून विजय मिळवला. त्याच वर्षी, जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील त्यांनी यश संपादन केले. जिल्हा परिषद निवडणुकीत ३३,८४५ मतांपैकी २६,५७१ मतदान झाले, त्यामध्ये त्यांना ५३.७३% म्हणजेच १४,२७९ मते मिळाली, जो त्यांच्या जनमानसातील पकडीचा पुरावा आहे. सन २०१९ मध्ये ते वाघोली ग्रामपंचायत पॅनेल प्रमुख बनून ग्रामपंचायत ताब्यात घेतली. कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा संवाद आजही त्यांचे सर्वात मोठे बळ आहे. आमदार माउली आबा कटके यांना मतदारसंघात आधुनिक श्रावणबाळ म्हणून ओळखले जाते

विधायक कामांचे विराट पर्व
विकासाची पंचसूत्री कटके यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट आराखडा तयार केला आहे आणि तो ते प्रभावीपणे राबवताना आपल्याला दिसत आहेत. मतदार संघात थोड्याच काळातच कोट्यावधी रुपयांचा निधी त्यांनी उपलब्ध करण्यासाठी यश मिळवले आहे. मतदारसंघातील रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधा हे त्यांच्या कामाचे प्रमुख केंद्र आहे. दुर्गम वस्त्यांना जोडणारे रस्ते, शहरी भागातील चौकांची सुधारणा, उड्डाणपूल आणि रस्त्यांचे डांबरीकरण ही कामे त्यांनी मार्गी मार्गी लावण्याचा विडा उचलला आहे. गेल्या काही वर्षा पासून शिरूर-हवेली विधानसभा मतदान संघातील प्रलंबित कामे त्यांच्यामार्फत ते मार्गी लावताना दिसत आहेत. त्यांच्या कामातून ते नेहमीच तत्काळ उपाययोजना करून आपल्या कामाची ख्याती दाखवून देतात

भावी पिढी घडवण्याचे ध्येय
जिल्हा परिषद शाळांची उभारणी, माध्यमिक शाळांना संगणक लॅब आणि कन्या शाळांसाठी विशेष योजना ते राबवत असताना दिसून येतात. स्मार्ट स्कुलसारख्या उपक्रमात स्वतः सहभागी होऊन आपल्या मतदार संघाच्या विकासात भर कशी पडता येईल यांच्याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष आहे. शिरूर व हवेली गटातील १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ, करिअर मार्गदर्शन मेळावा, गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा, अशा उपक्रमांचे आयोजन नियमितपणे केले जाते. आमदार माउली आबा यांच्यामार्फत नेहमीच केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते. शालेय साहित्य, पुस्तके, रेनकोट, छत्री यांचे वाटप विद्यार्थ्यांना, पालिका कर्मचारी आणि नागरिकांना आपण पाहिले आहे म्हणजेच नागरिकांना आपल्या दैनंदिन जीवनातील आवश्यक असणाऱ्या वस्तूंची देखील मदत ते नेहमीच करत असतात. ‘प्रमुख चषक’, ‘ प्रीमियर लीग करंडक’ तसेच बास्केटबॉल स्पर्धा आयोजित करून मुला- मुलींना व्यावसायिक पातळीवरील खेळण्याची संधी देण्याचे देखील आमदार माउली आबा कटके यांच्याकडून काम केले जाते.

महिलांचे सक्षमीकरण
आमदार कटके यांनी हजारो महिलांना बचत गटामार्फत योजना देऊन महिलांचे सक्षमीकरण केले. बचत गटांमार्फत महिलांना पीठ गिरणी, शिलाई मशिन वाटप आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण वर्गांचे मोफत आयोजन केले. महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून समाजातील महिलांचा आत्मविश्वास वाढवला.
सिंचन प्रकल्प, वीज पुरवठा, पीकविमा, कर्जमाफी यांसारख्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर नेहमी पुढाकार घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा वाढवणे, नवीन दवाखाने आणि तातडीची ऍम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध करून देणे यांवर भर देताना दिसत आहेत. गेल्या ११ महिन्यामध्ये जवळपास २० कोटी रुपयांची आर्थिक सवलत आमदार कटके यांनी मतदार संघातील नागरिकांना मिळवून दिली आहे.

सामाजिक बांधिलकी
माउली आबा कटके हे संकटात धावून जाणारे आणि जनतेच्या वेदनांशी जोडलेले लोकप्रतिनिधी आहेत. पूर, दुष्काळ, अपघात किंवा आजारपणाच्या प्रसंगात ते नेहमी तत्पर असतात मतदार संघातील प्रत्येक नागरिक हा आपल्या कुटुंबाचा भाग आहे या पद्धतीने त्यांचे सहकार्य नागरिकांना लाभत आहे. कोविडसारख्या महामारीत त्यांनी नागरिकांना साठी स्वखर्चाने कोविड केअर सेंटरची उभारणी करून आपल्या मतदार संघाच्या नागरिकांची सेवा केली, मतदार संघातील नागरिकांसाठी कॉलेजच्या ठिकाणी येथे ‘कोविड सेंटर’ सुरू केले, आयुर्वेदिक कॉलेज आणि खासगी रुग्णालये कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून दिली. स्वखर्चातून ५० हजाराहून अधिक लस उपलब्ध करून दिली आणि परप्रांतीय कामगारांना स्वगृही परतण्यात मदत करून सामाजिक बांधिलकी जपणारा नेता म्हणून आमदार माउली आबा कटके यांची ओळख आहे.

आधुनिक श्रावण बाळ
धार्मिक, सांस्कृतिक आणि सर्वधर्म समभाव मानणारे नेते तसेच आधुनिक श्रावण बाळ अशी देखील त्यांची मतदार संघात ख्याती आहे. काशी दर्शन व विविध धार्मिक स्थळ यात्रा, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी पाडवा पहाट अशा उपक्रमांचे आयोजन करून धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपला. सर्वधर्म समभावातून मुस्लिम बांधवांना इफ्तार भेट देणे, मिठाई वाटप करणे, तसेच श्री हनुमान जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौतम बुद्ध जयंती यांमध्ये नेहमीच यांचा सहभाग असतो.

कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर
कार्यकर्त्यांसाठी आबा म्हणजे आश्वासक आधारवड आबा नेहमी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. दिवस असो वा रात्र, कोणत्याही गावातून मदतीचे आवाहन आले की आबा स्वतः पुढाकार घेऊन ते काम पूर्ण करतात. ‘जनतेचे प्रश्न हेच माझे प्रश्न आहेत’ हा त्यांचा जीवनमंत्र आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे की, आबा असतील तर कुठलेही काम अडणार नाही. त्यांच्या वाढदिवशी हा विश्वास आणि आपुलकी जनतेच्या उत्सवात परिवर्तित होतो. त्या दिवशी केवळ शुभेच्छांचा वर्षाव होत नाही तर शेकडो-हजारो कार्यकर्ते व नागरिक आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकत्र येतात. गावोगावी सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते; गरजू कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाते; विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जाते. शुभेच्छा संदेशांनी भरलेले मोबाईल, सत्कार समारंभात फुलणारी गर्दी, आणि सामाजिक उपक्रमातून उमटणारी कृतज्ञतेची भावना हे सर्व मिळून त्यांच्या वाढदिवसाला खऱ्या अर्थाने जनतेचा उत्सव बनवतात.


भविष्याचा वेध आणि विकासाचे संकल्प
आमदार कटके यांचे स्वप्न आहे की, आगामी काळात मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत विकास पोहोचवावा.
आधुनिक शिक्षण संस्था : प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण, सर्वसमावेशक आरोग्य सुविधा : सहज व प्रभावी आरोग्य सेवा, शेतकऱ्यांसाठी बाजारपेठा : योग्य भाव व थेट बाजार, महिलांसाठी स्वतंत्र योजना : अधिक सक्षम बनविण्यासाठी. तरुणांसाठी उद्योग संधी : स्थानिक रोजगार व उद्योगाच्या संधी.
मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या मनात एकच भावना आहे : आबा आमचे आहेत, आणि आम्ही आबांचे आहोत.
आमदार ज्ञानेश्वर माऊली आबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

---------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ODI World Cup 2025: भारतीय संघाची विजयाने दणक्यात सुरुवात! दीप्ती शर्मा - स्नेह राणाची फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही कमाल

भीमा नदीतील पाण्यामुळे सीनेचा पूर ओसरेना! सोलापूर-विजयपूर महामार्ग आजही बंदच राहणार; उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

मोठी बातमी! ‘मकोका’ची कारवाई टाळण्यासाठी मागितली ६५ लाखांची खंडणी! कोल्हापुरातील सहायक फौजदारासह 5 जणांवर अकलूज पोलिसांत गुन्हा, दोघे अटकेत

Attacked on Ex Minister in Jail : खळबळजनक! माजी मंत्र्यावर तुरुंगात जीवघेणा हल्ला; डोक्याला गंभीर इजा!

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राची आकांशा नित्तूरे दुसऱ्या फेरीत; दिव्या भारद्वाजचीही आगेकूच

SCROLL FOR NEXT