पुणे

शिरूरमध्ये शिव महापुराण कथा सोहळा

CD

शिरूर, ता. २४ : ‘‘समाजाच्या सर्व समस्या आणि मानवी जीवनातील दुःख हलके करण्याचेच नव्हे; तर मुळासकट नष्ट करण्याचे सामर्थ्य शिवतत्वात आहे. चांगल्या मनाने, दृढ विश्वासाने, अथक परिश्रमातून, मनापासून केलेल्या प्रयत्नांतून परोपकारी श्रद्धेने आणि तल्लीनतेने केलेले कुठलेही कर्म जीवन यशस्वी करू शकते,’’ असे विचार आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी येथे व्यक्त केले.
श्री शिव महापुराण कथासोहळ्याला मंगळवारी (ता. २४) सुरुवात झाली. श्री शिवाय नमस्तुभ्यं, हर हर महादेव, ‘रामलिंग महाराज की जय’ चा गजर आणि भजनांच्या सूरावटीत पंडित मिश्रा यांचे व्यासपीठावर आगमण झाले. त्यावेळी अवघा जनसागर शिवनामात तल्लीन झाला. या सोहळ्याचे निमंत्रक, श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल व दीना धारिवाल यांच्या हस्ते शिवमहापुराण व इतर धर्मग्रंथांचे पूजन झाले. आदित्य धारिवाल, साक्षी मेहता, उज्ज्वला लुंकड, सुरेखा चोपडा व कल्पना लुणावत यांच्या हस्ते आरती झाली. माजी आमदार पोपटराव गावडे व अशोक पवार, नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे आदी यावेळी उपस्थित होते.
शिवतत्त्वच विश्‍वाला तारणारे आहे. तथापि, शिवतत्त्वातील विचारांचा अंगीकार प्रत्येकाला शुद्धतेने, निस्वार्थीपणे, एकाग्रतेने आणि निरलस सेवाभावाने करावा लागणार आहे. शिवपुराण कथा ही मानवी कल्याणाचीच कथा आहे, असे नमूद करून पंडित मिश्रा म्हणाले की, शिवभक्ती करताना दृढ विश्वास आणि समर्पण भावना असेल तर फळ निश्चित मिळते. शिवभक्तीत एक अलौकिक शक्ती आहे. ईश्वर भक्तीतून अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते आणि जीवन सुखकर होते. शिवपुराण हे कुणाचे भविष्य सांगणारी कथा नाही तर समाजाला प्राप्त परिस्थितीचे ज्ञान आणि जीवन जगण्याचे भान देणारी गाथा आहे.
श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आशीष वर्मा यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगरसेवक विजय दुगड यांनी आभार मानले.

‘एक लोटा जल हर समस्या का हल’ हा संदेश देणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा सोहळ्यास मंगळवारी उत्साहात सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांतून हर हर महादेव आणि ‘प्रभू श्री रामलिंग महाराज की जय’ चा गजर झाला. कथा ऐकण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. २५ एकर जागेवर उभारलेला धर्मसभामंडप शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. अयोध्या ते लंका हा मार्गक्रमण करीत असताना प्रभू श्री रामचंद्रांनी विश्‍वकल्याणाच्या हेतूने ठिकठिकाणी शिवपिंडींची प्रतिष्ठापना व शिवमंदिरांची उभारणी केली. शिरूरचे श्री रामलिंग मंदिर याच मार्गातील प्रभू रामचंद्रांनी स्थापलेले महत्त्वाचे देवस्थान असल्याचे पंडित मिश्रा यांनी सांगितले.
००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT