पुणे

रांजणगावच्या उपसरपंचपदी शोभा शेळके

CD

शिरूर, ता. १५ : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शोभा रमेश शेळके यांची बिनविरोध निवड झाली.
इतर ग्रामपंचायत सदस्यांनाही पदाची संधी मिळावी, या उद्देशाने श्रीकांत पाचुंदकर यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या रिक्तपदासाठी सरपंच सुवर्णा वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी शोभा शेळके यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. ग्रामपंचायत अधिकारी गंगाधर दादासाहेब देशमुख यांनी या निवडणुकीकरिता निवडणूक निरीक्षक अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच शोभा शेळके यांचा आंबेगाव - शिरूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ज्योती पाचुंदकर, महेश फंड आदी यावेळी उपस्थित होते.


6235

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

SCROLL FOR NEXT