पुणे

ब क्षेत्रीय कार्यालयात शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी धावपळ

CD

ब क्षेत्रीय कार्यालय ः प्रभाग १६, १७, १८, २२

कागदपत्र पूर्ततेसाठी घाई गडबड

काळेवाडी ः निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी मंगळवारी (ता. ३०) सकाळपासूनच चिंचवड येथील ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात प्रचंड गर्दी होती. वेळेची मर्यादा लक्षात घेता अनेकांची घाई गडबड दिसून आली. अर्ज स्वीकृती कक्षासमोर मोठ्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता, हमी रक्कम भरणे आणि प्रस्तावकांची उपस्थिती यासाठी उमेदवारांना धावपळ करावी लागली.
चिंचवड येथील ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात महापालिका निवडणूक लढण्यासाठी विविध पक्षांसह अपक्षांची संख्या अधिक दिसून आली. उमेदवार मोठ्या उत्साहात येत होते. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा फौज फाटा होता. पोलिसांनी बॅरॅकेट्स लावून मार्ग बंद केला होता. केवळ उमेदवार, अनुमोदक व सूचक यांनाच प्रवेश दिला जात होता. मुख्य कार्यालयात गर्दी होती. दुपारी एकनंतर त्यात आणखी वाढ झाली. कार्यालयातील दोन मुख्य हॉल भरून गेल्याने इमारतीमध्ये गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे काही काळ पोलिसांनी अनेक कार्यकर्ते, सूचक व अनुमोदक यांना बाहेर काढले. यावेळी उमेदवार व कार्यकर्ते नाराज झाले. पोलिसांशी बाचाबाची झाली. दुपारी दोननंतर अर्ज भरण्यासाठी अवघा एक तास राहिला असताना अनेक उमेदवार धावपळ करत पोहोचले. शेवटचे ४५ मिनिटे असताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे वेळेची उद्‍घोषणा केली. वेळ संपल्यानंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही, अशी सूचना केली. अनेक कार्यकर्ते व उमेदवार शेवटच्या टप्प्यात अर्ज स्वीकारण्यासाठी व कागदपत्रे देण्यासाठी विनंती करताना दिसून आले. परिसरात चोख बंदोबस्त होता.

चिल्लर देऊन भरला अर्ज
महापालिका प्रभाग २२ मधून संजय गायखे यांनी धोतर, पांढरा कुर्ता, डोक्यावर गांधी टोपी आणि हातात काठी अशी शेतकऱ्याची वेशभूषा करून अर्ज दाखल केले. त्यासाठी पाच हजार रुपये शुल्क भरले. मात्र, सर्व सुटी नाणी होती. ती मोजताना अधिकाऱ्यांची दमछाक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election 2025: पुण्यातल्या भाजप-शिवसेना युतीची इनसाईड स्टोरी; 'त्या' 15 जणांची नावं आली समोर, शिवसेनेने 140 एबी फॉर्म वाटले

Sassoon Hospital : आईच्या किडनीदानातून मुलाला नवे जीवन; ससून रुग्णालयामध्ये ३५ वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया!

Horoscope : उद्यापासून त्रिपुष्कर योगसह बुधादित्य राजयोग; कन्यासह 5 राशींना तिप्पट धनलाभ, नवं वर्ष सुरू होताच 3 मोठी कामं होणार पूर्ण

Maharashtra Teacher Recruitment : आता शिक्षक भरतीची प्रक्रिया 'परीक्षा परिषदेमार्फतच' होणार; उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त!

India Economy: गुड न्यूज! भारत बनला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकलं मागे, GDP किती?

SCROLL FOR NEXT