पुणे

पुरंदरमधील जिल्हा बँकेस २२ कोटींचा नफा

CD

सासवड, ता. ३ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एक एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात पुरंदर तालुक्यातील १३ शाखांमधून २७ हजार ७३१ सभासदांना २८८ कोटी ६८ लाख १८ हजार इतके कर्ज वाटप केले होते. त्यापैकी २३७ कोटी १९ लाख ६२ हजार रुपये एवढी रक्कम वसूल झाली. ५१ कोटी ४८ लाख ५६ हजार थकबाकी असून, एकूण ८२.१७ टक्के एवढी वसुली झाली आहे. बँकेला २२ कोटी ६५ लाख ४० हजार रुपये इतका नफा झाल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक व पुरंदर-हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी दिली.

चालू खरीप हंगामाला एक एप्रिल २०२५ पासून सुरुवात झाली असून तालुक्यातील ९५ संस्थांपैकी ९५ संस्थांचे पिक कर्ज मंजूर झाले असून ७ एप्रिल पासून खरीप हंगाम वाटपास सुरुवात झाली आहे. याबाबत संचालक संजय जगताप यांनी तालुक्यातील सर्व विकास अधिकारी व सचिव यांची बैठक घेऊन ज्या शेतकरी सभासदांनी ३१ मार्च अखेर त्यांच्याकडील कर्जाचा भरणा केला असेल तेवढी रक्कम वाटप करण्याच्या सूचना केल्याची माहिती विभागीय अधिकारी महेश खैरे यांनी दिली.

दरम्यान, ३० एप्रिल २०२५ पर्यंत १५ हजार ५२९ सभासदांना १२१९५ हेक्टर क्षेत्रावर १५० कोटी ४६ लाख इतके कर्जवाटप केले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत सर्व शेतकरी सभासदांना तालुक्यातील १३ शाखांमधून खरिपाचे पीक कर्ज वाटप पूर्ण करण्याच्या सूचना संचालक जगताप यांनी दिल्या आहेत. बैठकीस वसुली अधिकारी किरण जाधव, पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, विकास अधिकारी राजन जगताप, अण्णा शिंदे, शिरीष जाधव, मयूर भुजबळ, पवन दुर्गाडे, सूर्यकांत जगताप, शिरीष जाधव, सचिव रफिक शेख, तुकाराम गायकवाड, हनीफ सय्यद, रवींद्र कांबळे, संदीप ताकवले, दीपक जगताप, अमोल यादव, विजय कांबळे, वैभव काकडे, अमोल फडतरे, जालिंदर बाठे, रसूल शेख, संतोष गुरव, सोमनाथ चव्हाण, दादा खोमणे, चंदू खोमणे, नितीन जगताप, सतीश शिंदे, सुहास जगताप इत्यादी उपस्थित होते.


१०० टक्के वसुली असलेल्या विकास सोसायट्या
हिवरे, कुंभारवळण, सासवड नं. ३, नीरा शिवतक्रार, गुळुंचे, जयमल्हार जेऊर, जेऊरग्राम जेऊर, पिंपरे खुर्द, भैरवनाथ पिसुर्टी, भैरवनाथ गुळुंचे, शिवशंभो बेलसर, भोसलेवाडी, कऱ्हा धालेवाडी, कोथळे, नाझरे सुपे, बोरमलनाथ पांडेश्वर, जयाद्री जेजुरी, हरगुडे, माहूर, पानवडी, तोंडल, श्रीनाथ वीर, धनकवडी, काळदरी, मांडकी नं. २, ज्योतिर्लिंग मांडकी या विविध कार्यकारी सोसायट्यांची वसुली १०० टक्के आहे.

* १०० टक्के वसुल संस्था - २६.
* ९० ते ९९ .९९ टक्के वसुल संस्था - १४
* ८० ते ८९ . ९९ टक्के वसुल संस्था - २०
* ७० ते ७९ . ९९ टक्के वसुल संस्था - १९
* ५० टक्केच्या आतील वसुल संस्था - ३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT