पुणे

पुरंदरमध्ये भूखंडांच्या ‘प्लॉटिंग’चा पूर

CD

सासवड, ता. ८ : पुरंदर तालुक्यात विमानतळाची घोषणा झाल्यापासून जमिनींचे भाव वाढू लागले आहेत. आता नवीन सरकार स्थापन झाल्यापासून विमानतळ प्रकल्पाबाबत हालचाली वाढल्याने जमिनीच्या बाजारभावात चांगलीच वाढ झाली आहे. गावागावातील नेतेमंडळी आणि तरुण दलालीत उतरल्याने अनधिकृत ‘प्लॉटिंग’ वाढले आहे, ज्यामुळे भविष्यात गुन्हेगारी आणि बकालपणा वाढण्याची शक्यता आहे.
पूर्वी आकर्षक जाहिरातींद्वारे भूखंड विकले जात होते, पण आता विमानतळाच्या अंतरावर आधारित जाहिराती फ्लेक्स, होर्डिंग्जशिवाय सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. सासवड, जेजुरी आणि विमानतळ परिसरात बेकायदा ‘प्लॉटिंग’ वेगाने सुरू आहे. पुणे-कात्रज मार्गावर आणि जेजुरी परिसरात मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे गुंठ्यांमध्ये रूपांतरण झाले आहे. पारगाव आणि माळशिरस रस्त्यावर एकराने जमिनी खरेदी करून गुंठे पाडले जात आहेत.
जमीन खरेदी-विक्री आणि कमिशनच्या वादातून हाणामारीच्या घटना घडल्या आहेत, तर महसूल विभागात चांगली कमाई सुरू आहे. गावात एजंटांची संख्या वाढली असून, पुणे-मुंबईतील श्रीमंत लोक जमिनी शोधत आहेत. काही एजंट गरीब शेतकऱ्यांकडून जास्त पैशांचे आमिष दाखवून जमिनी खरेदी करत आहेत.
विमानतळामुळे सासरी असलेल्या महिला माहेरच्या संपत्तीत हक्क मागू लागल्या आहेत, तर युवक मामाच्या गावाला जमिनीच्या किमती विचारत आहेत. पुणे-मुंबईतील लोक कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयात येत आहेत. दुष्काळी भागातील नोकरीसाठी शहरात गेलेले लोक आता गावी परत येत आहेत. सध्या विमानतळाबद्दल अनिश्‍चितता असली तरी, बेकायदा ‘प्लॉटिंग’मुळे तरुण आणि एजंट पैसे कमवत असले तरी, भविष्यात या भागात बकालपणा आणि गुन्हेगारी वाढण्याची भीती आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यात बोगस साठेखत आणि इसार पावत्यांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत आहे. एजंट कमी किमतीत इसार पावती व साठेखत करून घेतात आणि नंतर पाहिजे त्या भावात इतरांना फिरवतात. यामुळे गरीब शेतकरी यात पुरता अडकतो आणि त्याला कोणताही आर्थिक फायदा मिळत नाही. इसार पावती आणि साठेखताची स्टँप ड्यूटी शासनाने वाढवावी. यामुळे शेतकऱ्यांचे हित जपले जाईल आणि शासनालाही महसूल मिळेल.
- संजय जगताप, शेतकरी, आंबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT