पुणे

सासवडला पालखीतळाची पाहणी

CD

सासवड, ता. २७ : आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने मंगळवारी (ता. २७) जिल्हाधिकारी आणि ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने पालखी महामार्ग तसेच सासवड येथील पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात प्रशासकीय अधिकारी, आळंदी संस्थानच्या विश्‍वस्तांनी सोहळ्यासाठी आवश्यक सुविधांचा आढावा घेतला.
पाहणी दौऱ्यातील प्रमुख सूचना आणि अडचणी :
या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सूचना करून अडचणींवर तत्काळ लक्ष देण्याचे निर्देश दिले. सोहळा मार्गावरील सासवड हद्दीतील वीर फाटा जवळील कडबान वस्ती येथील मार्गाचे अपूर्ण काम तसेच महामार्गावर गटारांअभावी साचणारे पाणी याबाबत स्थानिकांनी तक्रारी केल्या. डुडी यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच बोरावके मळा येथील विसावा ठिकाणाजवळील पत्र्याचे शेड काढण्याबाबत पालखी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
दिवे घाटावरील झेंडेवाडीचा विसावा, सासवड येथील पालखी तळ आणि बोरावके मळा येथील विसावा या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. पालखी सोहळ्यादरम्यान रस्त्यांवरील अडचणी, विद्युत व्यवस्था, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि सुरक्षा व्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा करून सुधारणांसाठी सूचना देण्यात आल्या. माउलींचा पालखी सोहळा २२ आणि २३ जूनला सासवड (ता. पुरंदर) येथे दोन दिवस मुक्कामी असणार आहे. त्यानंतर २४ जूनला हा सोहळा जेजुरी मुक्कामी मार्गस्थ होईल.
या पाहणी दौऱ्यावेळी पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल, आळंदी देवसंस्थानचे प्रमुख विश्‍वस्त योगी निरंजन नाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळकृष्ण मोरे, दिंडी समाज संघटना सचिव मारुती महाराज कोकाटे, व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर वीर, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, माजी उपनगराध्यक्ष यशवंतराव जगताप, अजित जगताप, सुहास लांडगे, नायब तहसीलदार सोनाली वाघ, बांधकाम विभागाच्या अभियंता स्वाती दहिवाल, पालिका आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण यांच्यासह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chinchpokli Chintamani : ‘आगमनाधीश’… चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक; संभाजी महाराजांच्या रूपातील प्रतिकृती

'RSS म्हणजे भारतीय तालिबान, त्यांच्याकडून देशात शांतता बिघडवण्याचं काम..'; मोदींच्या कौतुकानंतर काँग्रेस नेत्याची सडकून टीका

अभिनयानेच दिलं जगण्याचं बळ ! पडत्या काळात एकटीने तारला संसार , ज्योती चांदेकर यांची प्रेरणादायी कारकीर्द

Chandu Borde: चंदू बोर्डे नाबाद 90

Latest Marathi News Updates : काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT