पुणे

पालखी सोहळ्यानंतर सासवड शहर चकाचक

CD

सासवड, ता. २४ : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा दोन दिवस मुक्कामी पालखी सोहळा आणि संत सोपानकाका महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळ्यामुळे सासवड (ता. पुरंदर) शहरात जमा झालेला प्रचंड कचरा आणि घाण दूर करण्यासाठी, सासवड नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारी (ता. २४) माउलींच्या पालखी प्रस्थानानंतर तातडीने स्वच्छता मोहीम राबविली. माउलींचा सोहळा तळाहून पुढे जेजुरीकडे मार्गस्थ झाल्यानंतर अवघ्या चार तासांत पालखीतळ स्वच्छ करून नागरिकांना फिरण्यासाठी सायंकाळपर्यंत तो खुला करण्यात आला.
पालखीच्या दोन दिवसांच्या मुक्कामादरम्यान लाखो वारकरी, भाविक आणि विविध दुकानांमुळे शहरात कचऱ्याचा डोंगर साचला होता. या पार्श्‍वभूमीवर, नगरपालिकेने १५० कर्मचारी, ४ ट्रॅक्टर, १४ स्वयंचलित घंटागाड्या, अग्निशामक दल, दोन सेजिंग मशिन आणि जेसीबीच्या साहाय्याने सुमारे २२ टनांहून अधिक कचरा उचलण्यात आला. आरोग्यप्रमुख मोहन चव्हाण यांनी सांगितले की, बुधवारी आणि गुरुवारीही चंदन टेकडी ते वीर फाटा आणि शहरातील सर्व भागांतून आणखी ३० ते ३५ टन कचरा उचलण्यात येणार आहे. यंदा सकाळीच पाऊस झाल्याने कचरा उचलण्याचे काम थोडे अवघड झाल्याचे त्यांनी नमूद केले.

नियोजनबद्ध कामामुळे मोहीम यशस्वी
सोहळ्यादरम्यान कचरा उचलण्याचे काम सुरूच होते. पालिकेने प्रत्येक दिंडीला कचरा आणि शिल्लक अन्न साठवण्यासाठी मोठ्या पिशव्या देऊन उघड्यावर कचरा न टाकण्याचे आवाहन केले होते, ज्यामुळे स्वच्छतेच्या कामाला मदत झाली. यासाठी स्वतंत्र पथकही नेमण्यात आले होते. मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण आणि माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या राबवण्यात आली.

पावडर फवारणी आणि बाह्य संस्थांचे सहकार्य
पालिकेकडून शहरात सर्वत्र पावडर फवारणी तसेच लिक्विड जंतुनाशकाची फवारणी करण्यात येत आहे, जेणेकरून आरोग्य राखले जाईल. पुणे येथील आदर पूनावाला यांच्या ११ स्वच्छता कर्मचारी, तसेच पाच वाहनांनी या स्वच्छताकार्यात मोठा हातभार लावल्याचे आरोग्यप्रमुख चव्हाण यांनी आवर्जून सांगितले. आरोग्य विभागातील बापू गायकवाड, संजय जगताप, विशाल पवार, राजू भोंडे, बुवा भांडवलकर आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही साफसफाई मोहीम राबविण्यात आली, तसेच निर्मलवारीअंतर्गत शहरात हजारो फिरत्या स्वच्छतागृहांमुळे व्यवस्थेमुळे स्वच्छतेवरील ताण कमी झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Department: भ्रूणहत्येची माहिती द्या, एक लाखाचे बक्षीस घ्या, कन्या सन्मानदिनी आरोग्य विभागाचे आवाहन

'डार्लिंग, आय लव्ह यू' वीण दोघातली ही तुटेना मालिकेत स्वानंदींला ऐकू आले समरचे प्रेमळ शब्द, दोघांची पहिली भेट आणि...

Ajit Pawar: सरकारसोबत खासगी क्षेत्रही आरोग्यसेवेत पुढे यावे; दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करण्याचे आवाहन : अजित पवार

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीनिमित्त मथुरा-वृंदावनला चाललात? मग जाणून घ्या कसं होणार आहे कान्हाचं दर्शन!

वॉशिंग पावडर निरमा... साक्षी- प्रियाचा जेलमधील मारामारीचा सीन पाहून प्रेक्षक हसून बेजार; म्हणतात- यांची WWF लावली तर...

SCROLL FOR NEXT