पुणे

संजय जगताप यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश

CD

सासवड, ता. १५ : पुरंदर, हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे पुणे जिल्हा ग्रामीणमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सासवड येथील पालखी तळावर बुधवारी (दि.१६) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा (दक्षिण) भाजपचे अध्यक्ष शेखर वढणे यांनी दिली.
संजय जगताप यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली असून त्यांचा संपूर्ण पुणे जिल्ह्यात मोठा संपर्क आहे. त्यांचे पुणे जिल्ह्यात सहकारी संस्था, शिक्षण संस्था, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मोठे काम आहे. याचा फायदा भाजपला या भागात बळकटी आणण्यासाठी होणार आहे. बुधवारी पक्षप्रवेशासाठी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भाजप मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे वढणे यांनी सांगितले.
आतापर्यंत मुंबई येथे विविध भागांतील नेत्यांचे भाजप प्रवेश झाले आहेत. मात्र, संजय जगताप यांचा पक्षप्रवेश हा स्थानिक भागात होणारा पहिलाच प्रवेश असल्याचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी सांगितले. या मुळे या प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT