पुणे

लंपीच्या नियंत्रणासाठी पुरंदर तालुक्यात मोहीम

CD

सासवड, ता. २६ : पुरंदर तालुक्यात लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत, अशी माहिती पुरंदर तालुक्याच्या पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अस्मिता कुलकर्णी यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, पशुसंवर्धन विभागाने आढावा बैठक घेऊन उपाययोजना, सर्वेक्षण आणि औषधोपचार सुरू केले आहेत.
तालुक्यात शासकीय पशुवैद्यकांची कमतरता असूनही, त्यावर तोडगा काढून लसीकरण आणि औषधोपचार केले जात आहेत. यामुळे उपचारानंतर बहुतांश जनावरे बरी होत आहेत. सध्या तालुक्यात १०२ बाधित जनावरे आढळली होती. त्यापैकी ९८ जनावरे बरी झाली आहेत. आता केवळ चार जनावरे बाधित असून, त्यांच्यावरही उपचार आणि लसीकरण सुरू आहे. ती लवकरच बरी होतील, अशी अपेक्षा डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केली. प्रतिबंधात्मक लसीकरण ‘गोट फॉक्स’ लशीद्वारे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND 4th Test: जडेजाने इतिहास घडवला! गॅरी सोबर्स यांचा ५९ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी; लक्ष्मणच्याही पंक्तीत स्थान

Uddhav Thackeray: पुढचा काळ नक्कीच चांगला! राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं भावनिक विधान; म्हणाले...

AI क्रांतीचा फटका! कामगिरी नव्हे, कौशल्य हवे! TCS ने बदलली खेळी, 12 हजार कर्मचाऱ्यांची करणार कपात

Mumbai Local Megablock: मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे ‘मेगाहाल’; सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडले महागात

GST On UPI: २००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या युपीआय व्यवहारांवर जीएसटी आकारला जाणार का? सरकारनं स्पष्टच सांगितलं!

SCROLL FOR NEXT