पुणे

भाविकांचे श्रद्धास्थान कऱ्हे काठावरील सिद्धेश्वर मंदिर

CD

जीवन कड : सकाळ वृत्तसेवा
सासवड : सासवड (ता.पुरंदर) येथील कऱ्हा नदीच्या काठावर वसलेले आणि निसर्गरम्य परिसरातील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
या पांडवकालीन मंदिराचा प्राचीन ग्रंथांमध्येही उल्लेखित आहे. मंदिराचा परिसर शेती, मोर आणि इतर वन्य प्राण्यांच्या वावरामुळे भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण बनले आहे.
श्री सिद्धेश्वर देवस्थान सुधार समिती या मंदिराची देखभाल करते. सासवड नगरपालिका, स्थानिक शेतकरी आणि नागरिक या कामात सक्रिय सहकार्य करतात. श्रावण महिन्यातील उत्सवांसाठी येथे विशेष तयारी केली जाते, ज्यात भाविकांसाठी फराळाची व्यवस्था, वाहनतळ आणि बैठक व्यवस्था यांचा समावेश असतो.
दरम्यान, शिखर शिंगणापूर यात्रेतून परतल्यावर प्रथम मानाची कावड सिद्धेश्वर मंदिरात आणण्याची परंपरा येथे पूर्वापार चालत आलेली आहे. या प्रसंगी कावडीचे मानकरी आणि भाविकांसाठी भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो.


परिसरातील पर्यटन स्थळे
* चांगावटेश्वर मंदिर
* संगमेश्वर मंदिर
* संत सोपानकाका समाधी मंदिर, सासवड
* काळभैरवनाथ मंदिर, सासवड
* म्हस्कोबा मंदिर, कोडीत, वीर
* चतुर्मुखी महादेव मंदिर, गराडे
* कानिफनाथ गड, बोपगाव
* मल्हारगड, सोनोरी
* ढवळगड, आंबळे
* खंडोबा मंदिर, जेजुरी
* पांडेश्वर मंदिर
* सिद्धनाथ मंदिर, नायगाव

सोयी-सुविधा:
* पहाटे महारुद्राभिषेक
* दिवसभर फराळाची व्यवस्था
* वाहन व्यवस्था
* भाविकभक्तांना बैठक व्यवस्था
* रंगरंगोटी आणि पेव्हिंग ब्लॉक.


श्रावण महिन्यातील उत्सवानिमित्त सर्व तयारी पूर्ण झाली आहे. श्रावणात दर सोमवारी येणाऱ्या भाविकांच्या फराळ, वाहनतळ, बैठक व्यवस्था उपलब्ध आहे. परिसरातील शेतकरी, नागरिक आणि सासवड नगरपरिषद यांच्या वतीने आवश्यक सहकार्य मिळते. भाविकांनी परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी सहकार्य करावे.
- संदीप जगताप, सदस्य श्री सिद्धेश्वर देवस्थान सुधार समिती

मदतीसाठी संपर्क:
सासवड पोलिस ठाणे : ०२११५-२२२३३३

05311, 05313

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND 4th Test: जडेजाने इतिहास घडवला! गॅरी सोबर्स यांचा ५९ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी; लक्ष्मणच्याही पंक्तीत स्थान

Uddhav Thackeray: पुढचा काळ नक्कीच चांगला! राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं भावनिक विधान; म्हणाले...

AI क्रांतीचा फटका! कामगिरी नव्हे, कौशल्य हवे! TCS ने बदलली खेळी, 12 हजार कर्मचाऱ्यांची करणार कपात

Mumbai Local Megablock: मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे ‘मेगाहाल’; सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडले महागात

GST On UPI: २००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या युपीआय व्यवहारांवर जीएसटी आकारला जाणार का? सरकारनं स्पष्टच सांगितलं!

SCROLL FOR NEXT