सासवड, ता. १० : सासवड (ता. पुरंदर) शहरातील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर असलेल्या ४० व्यायाम साधनांची ओपन व्यायामशाळा दुरुस्तीनंतर नागरिकांसाठी पुन्हा सज्ज झाली आहे.
या व्यायामशळेमधील अनेक साधने मोडतोड होऊन नादुरुस्त झाली होती. नागरिकांनी केलेल्या निवेदनांची दखल घेत सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर बेरिंग बदलणे, वेल्डिंग करणे आणि चोरीला गेलेले भाग जोडणे यांसारखी आवश्यक कामे करून ही सुविधायुक्त व्यायामशाळा सुरू करण्यात आली. माजी नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी कामाची पाहणी करून योग्य मार्गदर्शन केल्याची माहिती तानाजी सातव यांनी दिली.
या दुरुस्तीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, एकाच वेळी सुमारे ५० नागरिक व्यायाम करू शकतात. नियमित येणाऱ्या नागरिकांनी आपला पालखी तळ नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपमार्फत लवकरच कचरा व्यवस्थापन, सूचना फलक लावणे आणि योग मार्गदर्शिका लावणे यांसारखे उपक्रम राबवले जाणार असल्याचे सातव यांनी सांगितले.
05837