सासवड, ता. १० : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सासवड (ता. पुरंदर) येथील मएसो वाघिरे विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
विद्यालयाच्या सन १९८८- ८९ या वर्षातील १० वीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत २२ हजार १०० रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा केली. ही मदत त्यांनी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी रवींद्र गाडेकर, शकील बागवान, विजय निंबाळकर, शरद नेटके आणि हेमंत टिळेकर उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे पिके, फळबागा, सुपीक माती, तसेच जनावरे वाहून गेल्याने आणि घरात पाणी शिरल्यामुळे शेतकरी असहाय झाले आहेत. अशावेळी समाजातील सर्व घटकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल्यास त्यांचा दिवाळीचा सण चांगला साजरा होईल.
- विक्रम राजपूत, तहसीलदार, पुरंदर
05842