पुणे

प्रचारास रात्री १० पर्यंतच परवानगी

CD

सासवड, ता. ८ : पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषद निवडणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच ​रात्री १० पर्यंतच प्रचार करता येईल. सभा, मिरवणुका आयोजित करण्यासाठी किमान ४८ तास आधी आणि जास्तीत जास्त पाच दिवस आधी परवानगी घेणे अनिवार्य आहे, असे आवाहन पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी केले.
सासवड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक निर्णय अधिकारी सतीश थेटे, साहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण आणि पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी शनिवारी (ता. ८) पालिका सभागृहात सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रिया तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. थेटे आणि डॉ. चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच शांततेत व पारदर्शीपणे निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व स्तरावरून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


उमेदवारासाठी अनामत रक्कम
​​खुल्या प्रवर्ग : एक हजार रुपये
महिला व इतर प्रवर्ग : ५०० रुपये


पदनिहाय खर्च मर्यादा (रुपयांत)
नगराध्यक्ष : ७ लाख ५० हजार
सदस्य : २ लाख ५० हजार


सूचकासाठी सूचना
नगराध्यक्ष पदासाठी सूचक शहराच्या कोणत्याही प्रभागातील मतदार असू शकतो
​​सदस्य पदासाठी सूचक हा उमेदवार उभा असलेल्या त्याच प्रभागातील मतदार यादीत असणे आवश्यक
एका मतदाराला फक्त एकदाच सूचक होता येईल.
एकापेक्षा जास्त उमेदवारांना एकच मतदार सूचक असल्याचे आढळून आल्यास, ते सर्व अर्ज बाद ठरविले जाणार

सोशल मीडिया वापर जपून करा
उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना जातीय, धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. कोणतेही वाद, एकमेकांना आव्हान देणारे संदेश प्रसारित करू नयेत.
उमेदवारांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारच्या गैरवर्तनापासून परावृत्त करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक कदम यांनी केले आहे.


05981

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT