पुणे

सासवडमध्ये महायुतीत बिघाडी!

CD

सासवड, ता. १७ : सासवड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अखेरच्या दिवशी झालेल्या घडामोडींमुळे महायुतीतच मुख्य लढत निश्चित झाली आहे. राज्यात एकत्र असलेली महायुती अनेक ठिकाणांप्रमाणे सासवडमध्येही विखुरल्याचे चित्र असून, भाजप विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडूनही नगराध्यक्षपदाचा उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. दरम्यान, सासवडमधील ही निवडणूक पक्षांतर्गत मतभेद आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे.
सासवड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठी चुरस पाहायला मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी एकूण १५ तर नगरसेवक पदासाठी १२८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सतीश थेटे यांनी दिली. दरम्यान, उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. सासवड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुला प्रवर्गासाठी राखीव असून ११ प्रभागांतून २२ नगरसेवक निवडले जाणार आहेत. सोमवारी (ता. १७) नगराध्यक्षपदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी ५० उमेदवारी अर्ज दाखल झाले. अखेरच्या दिवशी नगर परिषद कार्यालयात इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. निर्धारित वेळेनंतर आतमध्ये असलेल्या उमेदवारांचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सासवडच्या नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी आमदार योगेश टिळेकर आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महायुतीतील शिवसेना-राष्ट्रवादीकडून शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन भोंगळे यांनी शिवसेनेकडून यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याबरोबरच महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुकाप्रमुख अभिजित जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांसह घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला. अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख व आमदार सचिन आहेर यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संकटात धावून आला ‘लालबागचा राजा’! भुलेश्वरचा राजा मंडळाला ११ लाख, तर मृतांच्या कुटुंबीयांनासाठीही आर्थिक मदत जाहीर

IND vs SL 2nd Test: यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडो वादाचा नवा खळबळजनक Video समोर! ICC वर गंभीर आरोप... नेमकी 'ढुशी' मारली कोणी?

प्राजक्ता माळीला 'फरसाण'वरून का चिडवलं जातं? अभिनेत्याने सांगितला हास्यजत्रेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा

Marathi News Live Updates : सुप्रीम कोर्टाचा आदेश; बलात्कार प्रकरणातील दोषी तरुण तेजपालला दोन आठवड्यांत शरणागती पत्करण्याचे निर्देश

leopard spotted in Satave Kolhapur : आरळे-शहापूर रस्त्यावर दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर; तरुणांनी कॅमेऱ्यात कैद केला थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT