पुणे

विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविणार

CD

सासवड, ता. २ : ‘‘सासवडकर नागरिकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी मी सार्थ ठरवेन. भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवल्या जातील. सर्व नागरिक आणि नवनिर्वाचित सदस्यांना विश्वासात घेऊन, सर्वांच्या एकमताने सासवडचा सर्वांगीण विकास केला जाईल. माजी आमदार संजय जगताप यांच्या व्हिजनप्रमाणे शहराचे सुशोभीकरण आणि विकासकामे करण्याला माझे प्राधान्य असेल,’’ असे प्रतिपादन सासवडच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आनंदीकाकी चंदुकाका जगताप यांनी केले.
सासवडच्या नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी ​शुक्रवारी (ता. २) नगराध्यक्ष दालनात पदग्रहण करून अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला. यावेळी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी आमदार संजय जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे, शहराध्यक्ष आनंद जगताप, सत्ताधारी गटनेते अजित जगताप, नगरपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.
चंद्रशेखर वढणे म्हणाले, ‘‘बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे. गेल्या निवडणुकीत शून्य असलेल्या नगरसेवकांची संख्या आता ६४वर पोहोचली आहे. जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार सासवडचा कायापालट करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कटिबद्ध राहतील.’’
माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी प्रास्ताविकात दिवंगत लोकनेते चंदुकाका जगताप यांच्या विकासकामांच्या वारशाचा उल्लेख केला. मागील काळात तत्कालीन आमदार संजय जगताप आणि आनंदीकाकींच्या मार्गदर्शनामुळे शहराची जी प्रगती झाली, तीच घोडदौड आता अधिक वेगाने पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी उपनगराध्यक्ष संजय ग. जगताप यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परवडणारी घरे, मोफत वीज, स्वस्त बस भाडे अन् महिलांसाठी मासिक भत्ता... ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यात मोठ्या सवलतींची घोषणा

Akola Police : अकोला पोलिसांची ‘स्मार्ट पोलिसिंग’कडे पाऊल; AI-आधारित WhatsApp चॅटबॉट ‘अकोला कॉप कनेक्ट’चा शुभारंभ!

Latest Marathi News Live Update: राहुल नार्वेकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांची जोरदार टीका

Nawab Malik Statement :नवाब मलिकांचं मुंबई महापौर पदाबाबत मोठं विधान अन् भाजपवरही साधला निशाणा, म्हणाले...

Mundhwa Land Scam : मुंढवा सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात रवींद्र तारूला दिलासा नाही!

SCROLL FOR NEXT