पुणे

​सासवडचा ३९२ कोटींचा अर्थसंकल्प

CD

सासवड, ता. २७ : शहराच्या सर्वांगीण विकासाची नवी दिशा स्पष्ट करणारा आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कोणताही फटका न देणारा सासवड नगरपरिषदेचा २०२६-२७ या वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी (ता. २७) मंजूर करण्यात आला. नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ३९२ कोटी ६५ लाख रुपयांच्या खर्चाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाल्याचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी सांगितले.
या अर्थसंकल्पात प्रशासनाने कोणतीही कर वाढ सुचवलेली नाही. नगरपरिषदेला महसुली आणि भांडवली अशा दोन्ही स्वरूपात मिळून एकूण ४२६ कोटी १४ लाख रुपयांची जमा अपेक्षित धरण्यात आली आहे. तर दुसरीकडे, शहराच्या विकासासाठी आणि प्रशासकीय कामांसाठी ३९२ कोटी ६५ लाख रुपये खर्च होणार असल्याचे नियोजित करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सासवड शहराच्या सौंदर्यीकरणासोबतच पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणावर मोठा भर दिला जाणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी सांगितले. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना या अर्थसंकल्पातून न्याय देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने नवीन पाणीपुरवठा योजना, नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी नमो उद्यान, सांडपाणी व्यवस्थापनासाठी ''भुयारी गटर २'' आणि पर्यावरण संवर्धनासाठी ''माझी वसुंधरा'' यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे. केवळ भौतिक सुविधाच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत शासन नियमाप्रमाणे दिव्यांग कल्याण, महिला व बालकल्याण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येकी पाच टक्के निधीची विशेष तरतूद करण्यात आली आहे. सभेच्या कामकाजादरम्यान नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्यासह सर्व उपस्थित नगरसेवक आणि नगरसेविकांनी शहराच्या प्रलंबित कामांबाबत आणि भविष्यातील नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT