पुणे

​सासवडमध्ये रस्ते चकाचक

CD

सासवड, ता. १ : महाराष्ट्र भूषण डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी प्रीत्यर्थ एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवारी (ता. १) पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी, तसेच हवेली तालुक्यातील लोणी काळभोर आणि भेकराईनगर परिसरात महास्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.
सासवडसह इतर ठिकाणी सकाळी साडेसातपासून या अभियानाला सुरुवात झाली. यामध्ये सासवड परिसरातील शासकीय कार्यालये आणि रस्ते चकाचक करण्यात आले. प्रतिष्ठानच्या एकूण ५२५ सदस्यांनी श्रमदानात सहभाग नोंदवला.
या महास्वच्छता अभियानामध्ये दिवसभरात एकूण २४ टन सुका कचरा आणि ९ टन ओला कचरा, असा एकूण ३३ टन कचरा संकलित करण्यात आला. हा कचरा वाहून नेण्यासाठी एकूण ११ ट्रॅक्टर व ट्रॉलींचा वापर करण्यात आला.
​सासवडमधील पुरंदर पंचायत समिती कार्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, नवीन प्रशासकीय कार्यालय, महावितरण कार्यालय परिसरातील स्वच्छतेबरोबरच जेजुरी नाका ते महावितरण पर्यंतच्या रस्त्याची स्वच्छता केल्याची माहिती प्रतिष्ठानचे सदस्य रणजित जगताप यांनी दिली.

06487

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Rates : सोने दरात किरकोळ तर चांदीच्या दरात सलग तीन दिवस मोठी घसरण; आजचा भाव किती?

Latest Marathi News Live Update : लोणावळा घाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे रेट जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा दर ?

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक वादातून तरुणाचा जीव घेतला ; तीन आरोपींना अटक

Chhatraati Sambhajinagar: शहरात फक्त चार दिवसांचा रक्तसाठा; टंचाईने जीव टांगणीला, थॅलेसेमिया रुग्णांना चार ते पाच दिवसांची वेटिंग

SCROLL FOR NEXT