पुणे

सासवड पालखी तळाची पाहणी

CD

​सासवड, ता. २५ : सोहळा काळात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी वीज, पाणी, आरोग्य आणि रस्ते कामांबाबत सोहळा समितीने सासवड (ता. पुरंदर) येथे प्रशासनाला सूचना केल्या.
​यावेळी सासवडच्या नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, तहसीलदार विक्रम राजपूत, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलिस निरीक्षक कुमार कदम, तालुका आरोग्य अधिकारी विक्रम काळे, नगरसेवक राजन जगताप, प्रदीप राऊत, ज्ञानेश्वर जगताप, अर्चना जगताप व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते
सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ व कमिटीने सासवड नगरपरिषदेस चंदन टेकडी ते सासवड पालखी तळापर्यंत आवश्यक ठिकाणी वीज व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.​ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला फुरसुंगी ते दिवे घाट रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. महामार्गावर पुरेसा प्रकाश असावा आणि मुक्कामाहून पालखी प्रस्थान करताना वाहनांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी सूचना केली. सार्वजनिक बांधकाम विभागाला वीर फाटा ते बोरावके मळा पालखी विसावा या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्याची तर ​महावितरणला सेवा रस्त्यावर अडथळा ठरणारे विजेचे खांब तातडीने हलवण्याबाबत सूचना दिल्या. यंदा सोहळा जुलैमध्ये असल्याने पावसाची दाट शक्यता आहे. त्यामुळे शासनाने वारकऱ्यांसाठी गतवर्षीपेक्षा दुप्पट निवारा व्यवस्था उभारावी, अशी मागणी
तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

​रस्ता रुंदीकरणाचा पेच
वीर फाटा ते बोरावके मळा या रस्त्याचे भूसंपादन करून रुंदीकरण करण्याची मागणी पालिकेने केली. त्यावर महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता अभिजीत औटी यांनी, सासवड बाह्यवळण रस्ता सुरू झाल्याने शहरातील रस्ता आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे., असे स्पष्ट केले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रकाश निगडे यांनी नव्याने भूसंपादनासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता मात्र निधीअभावी काम रखडल्याचे सांगितले. यावर सोहळा कमिटीने तीव्र दखल घेत, जिल्हाधिकाऱ्यांकडे नव्याने प्रस्ताव सादर करून या प्रश्नी पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

Mhada Lottery: लॉटरीशिवाय घरांचे स्वप्न साकार! प्रथम येणाऱ्यास प्राधान्य; २० दिवसांत ६४ घरांची विक्री

Mangalwedha News: अवकाळीने द्राक्ष, डाळिंब मातीमोल, तरीही प्रशासनाचा 'निल' अहवाल; शेतकरी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT