पुणे

सासवड शहरात स्वच्छता महाअभियानाचा प्रारंभ

CD

सासवड, ता. १२ : महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून सासवड नगरपरिषदेने शहरात व्यापक स्वच्छता अभियान सुरू केले आहे. रविवारी सासवड-सोनोरी मार्गावर राबविलेल्या पहिल्या मोहिमेत चार तासांत १२ टन कचरा उचलून परिसर चकाचक करण्यात आला. आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी शहरातील एका भागात अशी मोहीम राबविली जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
या मोहिमेत माजी आमदार संजय जगताप, नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्यासह लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष श्रमदान केले. सासवडने स्वच्छतेचा वारसा जपत सलग सहा वर्षे देशात अव्वल क्रमांक पटकावला असल्याचे आरोग्य सभापती राजन जगताप यांनी या वेळी सांगितले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप, लीना वढणे आदी उपस्थित होते. नगरपालिकेचे १५० स्वच्छता दूत, १० घंटागाड्या, ८ ट्रॅक्टर आणि २ जेसीबीच्या साहाय्याने महामार्ग ते स्वामी समर्थ मठ परिसरातील कचरा हटवण्यात आला.

सासवडने आजवर स्वच्छतेत जे यश मिळवले, त्यामागे सासवडकर नागरिकांचे योगदान मोठे आहे. आणखी लोकसहभाग वाढवत प्रशासन आणि नागरिक यांच्या सहयोगातून सासवड शहर स्वच्छतेच्या क्रमवारीत यापुढेही देशात अग्रस्थानी राहील.
- संजय जगताप, माजी आमदार

नागरिकांनी स्वच्छता राखून आपला परिसर स्वच्छ ठेवावा. कचरा उघड्यावर टाकू नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- डॉ. कैलास चव्हाण, मुख्याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT