पुणे

सासवडमध्ये ‘बांबू बेट’ मोहीम

CD

सासवड, ता. २६ : सासवड (ता. पुरंदर) शहराचा पारा ४० अंशांवर पोहोचल्याने वाढत्या उष्णतेवर मात करण्यासाठी ‘कऱ्हा पुत्र नदी संवर्धन समिती’च्या वतीने नदीकाठी ‘बांबू बेट’ पुनरुज्जीवन मोहीम राबवण्यात येणार आहे. पर्यावरणाचे संतुलन आणि जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पूर्वी कऱ्हा नदीकाठी नैसर्गिक बांबूची दाट बेटे होती, जी पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यास मदत करत असत. ही वृक्षसंपदा नष्ट झाल्याने सासवडच्या तापमानात विक्रमी वाढ झाली आहे. बांबू इतर झाडांच्या तुलनेत ३५ टक्के अधिक ऑक्सिजन देतात, हे ओळखून समितीने पुन्हा लागवडीचा निर्धार केला आहे.
समितीचे संस्थापक अमित पवार म्हणाले की, ‘‘सासवडचे तापमान ४० अंशांपर्यंत जाणे ही धोक्याची घंटा आहे. बांबू लागवडीमुळे नदीपात्रात पाणी टिकून शहराचा थंडावा परत मिळण्यास मदत होईल.’’
समिती लवकरच नदीपात्राची पाहणी करून लागवड सुरू करणार असून, नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी (ता. २५) सासवडमध्ये ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे व्यवस्थापक नितीन यादव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात, ९७ टक्के झालं; उर्वरित मे पर्यंत पूर्ण होणार

IPL 2026, CSK vs GT: चेन्नईने दिली यष्टीरक्षक फलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी; गुजरातनेही केला संघात बदल

Malaria Risk in Summer: पावसाळ्यातच नाही, उन्हाळ्यातही वाढतोय मलेरियाचा धोका; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Live Update: पिक विम्यावरून शेतकऱ्यांचा संताप! 29 एप्रिलला आमरण उपोषणाचा इशारा

Ayodhya Train Tour: फक्त १६,७०० रुपयांत '६ धाम' यात्रा! IRCTCचा अयोध्येपासून पुरीपर्यंतचा धमाका; पाहा काय आहे खास पॅकेज!

SCROLL FOR NEXT