पुणे

जय मल्हार संस्थेच्या अध्यक्षपदी स्वप्नील ढमढेरे

CD

तळेगाव ढमढेरे, ता. ३ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील जय मल्हार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे आणि उपाध्यक्षपदी संकेत बाळासाहेब ढमढेरे या दोन सख्ख्या भावांची बिनविरोध निवड झाली आहे. सहकारी संस्थेच्या इतिहासात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर एकाच वेळी दोन सख्ख्या भावांना पदाधिकारी होण्याची संधी प्रथमच मिळाली आहे.
संस्थेच्या संचालक मंडळाची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून, नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पासाहेब धायगुडे व सहायक सचिव म्हणून अनिल लोहार यांनी कामकाज पहिले.
यावेळी बाळासाहेब जयवंत ढमढेरे, यशवंत जनार्दन ढमढेरे, भगवान पांडुरंग ढमढेरे, संजय रामराव ढमढेरे, प्रतीक बाळासाहेब ढमढेरे, माधव विष्णू चौधरी, उज्ज्वला बाळासाहेब ढमढेरे, दीपाली संभाजी ढमढेरे, लक्ष्मण विष्णू बागूल, बाळासाहेब भिकोबा घुमे हे नवनिर्वाचित बिनविरोध संचालक उपस्थित होते.
जिल्हा दूध संघाचे माजी संचालक बाळासाहेब ढमढेरे, बाजार समितीचे माजी उपसभापती ॲड. यशवंत ढमढेरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT