तळेगाव ढमढेरे, ता. ८ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार गुजर प्रशालेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ शिक्षिका अलका सातपुते, रूपाली ढमढेरे यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले.
‘‘स्त्री ही कुटुंबाची आणि समाजाची मुख्य आधारस्तंभ आहे. आई, बहीण, पत्नी, मैत्रीण अशा विविध नात्यांमधून स्त्री प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते. महिला दिन हा एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीचा सन्मान व आदर केला पाहिजे.’’ असे मत सातपुते, ढमढेरे यांनी व्यक्त केले. पर्यवेक्षक मोहन ओमासे यांच्या हस्ते महिला शिक्षकांचा गुलाबपुष्प, पेन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंद ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी सर्व महिला शिक्षकांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
Assoiated Media Ids : TGD26B08788
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.