पुणे

लोणी काळभोर पोलिसांकडून मंगळसूत्र २ चोरट्यांना अटककाळभोर पोलिसांना यश

CD

थेऊर, ता. १८ : चिक्की खरेदीच्या बहाण्याने दुकानदार महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेण्याची घटना थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील बोडके वस्तीवर रविवारी (ता.२९ जून) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. नुकताच या गुन्ह्याचा छडा लावून दोन चोरट्यांना पकडण्यास लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. सचिन अर्जुन ढगे (वय १९ रा. कदम बंगल्याजवळ, माऊली नगर, कात्रज, पुणे) व रोहित राजू माने (वय २५ रा. निंबाळकर वस्ती,दत्त मंदिराजवळ, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी संगीता पंडित बोडके (वय-४८, रा. बोडकेवस्ती, काकडे मळा रोड, थेऊर) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
लोणी काळभोर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता,आरोपींनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी चोरलेले १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व गुन्हा करतेवेळी वापरलेली दुचाकी असा एक लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

Latest Marathi News Live Update: एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

Baba Venga Prediction : इराण–इस्रायल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी चर्चेत

SCROLL FOR NEXT