थेऊर, ता.३० : स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून त्वरित वगळावीत थेऊरचे माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद माळी व मनसेचे हवेली तालुका संघटक प्रशांत खांडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.
थेऊर (ता हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना बंद होऊन सुमारे १५ वर्षांचा कालावधी उलटलेला आहे. कारखाना सुरू होता त्यावेळी कामगार वर्ग हा थेऊर गावात व कारखान्याचा कामगार हा कामगार वसाहतीमध्ये राहत होता; परंतु आता सर्व कामगार त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित झालेले असून त्यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून त्वरित वगळण्यात यावीत, अशी मागणी माळी व खांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. कारखान्याचे कामगार त्यांच्या मूळ गावी गेले असून, तेथील मतदार यादीत ते मतदार आहेत. उदाहरणार्थ हडपसर, वडगाव शेरी, कोंढवा, पुणे, बारामती, पुरंदर, इंदापूरसह महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात आहेत. मात्र, अद्यापही त्यांची नावे थेऊर येथील मतदार यादीत आहेत. यातील बरेच लोक त्यांच्या गावी सरपंच वा अन्य पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे दोन ठिकाणी मतदार असलेल्या लोकांनी थेऊर गावचा सरपंच ठरवणे लोकशाहीत योग्य आहे का? त्यामुळे ज्या नागरिकांची या मतदार यादीत नावे आहेत, मात्र गेल्या १० ते १५ वर्षांपासून थेऊर येथे राहत नाहीत, अशा स्थलांतरित मतदारांची जिल्हाधिकाऱ्यांनी बीएलओ मार्फत पडताळणी व पंचनामे करून ही नावे मतदार यादीतून तातडीने काढून टाकावीत, असे निवेदनात नमूद केले आहे. जिल्हा प्रशासन याबाबत नेमकी कोणती भूमिका घेणार आहे, याकडे थेऊरमधील जनतेचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.