पुणे

कुंजीरवाडीत मद्यधुंद रिक्षा चालकाची रॅश ड्रायव्हिंग

CD

थेऊर, ता. ५ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मद्यधुंद रिक्षा चालकाने रॅश ड्रायव्हिंग केल्याची घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नायगाव फाटा येथे बुधवारी (ता. ३) रात्री पावणेबारा च्या सुमारास घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना घडली नाही.मात्र रिक्षा चालकावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर दिलीप जगताप (वय ३८,रा. कुंजीरवाडी,ता.हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार सर्जेराव रामचंद्र दडस यांनी सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाहतुकीचे नियम न पाळता,बेफिकिरीने आणि अत्यंत वेगाने वाहन चालवणे, जे कायद्याच्या दृष्टीने गंभीर गुन्हा आहे. हे माहीत असतानादेखील रिक्षाचालक सागरने ऑटोरिक्षा (क्र. एमएच १२ डब्ल्युआर ४००९) मादक पदार्थाचे सेवन करून भरधाव वेगाने वेडीवाकडी चालवीत असताना पोलिसांना मिळून आला. सागरची पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्याचे सेवन केल्याचे डॉक्टरांनी अहवालात नमूद केले आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार वैशाली नागवडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OCI Card New Rule: नागरिकत्व नियमांत मोठा बदल! अल्पवयीन मुलांच्या पासपोर्टवर मोठी बंदी; OCI साठी नवे डिजिटल नियम लागू

Navi Mumbai Drug Racket : शांताबाई करंडेकर टोळीचा गेम ओव्हर! दिघ्यात लेडी डॉनचं साम्राज्य उद्ध्वस्त करत पोलिसांनी अवैध मालमत्तेवर फिरवला बुलडोझर

Latest Marathi News Live Update : बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू, रुग्णांना मोठा दिलासा

Mumbai: प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच! प्लॅटफॉर्म- लोकलमधील अंतराचा धोका; अनेक स्‍थानकांवर उपाययोजनांकडे दुर्लक्ष

महिन्यात राज्यभरात १४ भोंदूबाबांवर गुन्हे, खरात प्रकरणानंतर प्रकार उघड

SCROLL FOR NEXT